विदर्भ साहित्य संमेलन
![]() |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ही साहित्य संमेलने नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) इ.स. १९५४साली स्थापन झाली.
कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.
विदर्भ साहित्य संघाचे आजी आणि माजी अध्यक्षसंपादन करा
आतापर्यंत झालेली विदर्भ साहित्य संमेलनेसंपादन करा
- १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने विदर्भातील पहिले साहित्य संमेलन भरविण्यात आले. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठीभाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. या नव्या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून हैदराबादचे न्या. केशवराव कोरटकर यांना बहुमान देण्यात आला. स्वतः खापर्डे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. संस्थेचे नाव ‘विदर्भ साहित्य संघ’ असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला होता.
- १९४८साली : गोंदिया
- १२वे : १६ फेब्रुवारी १९५०; गडचिरोली की चंद्रपूर?; संमेलनाध्यक्ष मा.गो. देशमुख
- १९५७ साली : गोंदिया
- २१वे : १९५८; तळोधी बाळापूर (चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष यादव मुकुंद पाठक
- डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष बाळशास्त्री हरदास
- २५वे : २६-१२-१९६४, उद्घाटक यशवंतराव चव्हाण
- १९७१; सोमनाथ(तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष विश्राम बेडेकर
- २७वे : वर्धा
- १९७८; भंडारा; संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर
- ३४वे : २३-१०-१९८३; वरोरा(चंद्रपूर जिल्हा); संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
- ३५वे : १९८४, मेहकर (बुलढाणा जिल्हा)
- ३६वे : १९८५, अहेरी (जिल्हा [[गडचिरोली[[) : संमेलनाध्यक्ष गीता साने
- ३९वे : १९८८, गडचिरोली; संमेलनाध्यक्ष गझलसम्राट सुरेश भट
- ४०वे : १९८९, पुसद, संमेलनाध्यक्ष डाॅ. उषा देशमुख
- ४१वे : १९९०, चंद्रपूर
- ४३वे : १९९१; लाखनी, जिल्हा भंडारा संमेलनाध्यक्ष डॉ. भाऊ मांडवकर
- ४५वे : २८-११-१९९२; करंजा लाड (जिल्हा वाशीम); संमेलनाध्यक्ष डॉ.विठ्ठल वाघ
- ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.मो.दा. देशमुख
- अकोटला झालेले संमेलन
- ५४ वे : २००३ संमेलनाध्यक्ष प्रा. द.सा. बोरकर
- ५५ वे : २१ जानेवारी २००५ संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके
- ५६वे : २-४ नोव्हेंबर २००७; नरखेड (जिल्हा नागपूर); संमेलनाध्यक्ष नामदेव कांबळे
- ५७ वे : ८, ९, १० फेब्रुवारी २००८ संमेलनाध्यक्ष आशा सावदेकर
- ५८वे :१ ९-२१- डिसेंबर २००८; धानोरा (जिल्हा गडचिरोली); संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
- ५९वे : ४ ते६ डिसेंबर २००९; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी
- ६०वे : २८-३० जानेवारी २०११; वर्धा; संमेलनाध्यक्ष ज्योती लांजेकर
- ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; वाशीम; संमेलनाध्यक्ष कवी नारायण कुलकर्णी कवठेकर
- ६२वे : ७ ते ९ डिसेंबर २०१२; गोंदिया; डॉ. किशोर सानप हे संमेलनाध्यक्ष होते.
- ६३वे : २१-२३ फेब्रुवारी २०१४, आर्णी; कवी शंकर बडे
- ६४वे : १२-१४ डिसेंबर २०१४, तळोधी (बाळापूर); डॉ. अक्षयकुमार काळे
- ६५वे : २९-३०-३१ जानेवारी २०१६, चंद्रपूर; प्रा. डॉ. सदानंद देशमुख. हे संमेलन मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रायोजित केले होते.
- ६६वे : १९-२०-२१ जानेवारी २०१८, वणी (यवतमाळ), संमेलनाध्यक्ष - डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे
- ६७वे : विदर्भ साहित्य संघाचे ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे १४ व १५ मार्च २०२० दरम्यान होणार होते, पण कोरोना मुळे पुढे ढकलले गेले आणि २९ व ३० ऑक्टोबर २०२१ला संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष डाॅ. म.रा. जोशी हे होते.
विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलनेसंपादन करा
अंकुर साहित्य संमेलनसंपादन करा
हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो. विदर्भाबाहेर खानदेशातही अंकुर साहित्य संमेलने झालेली अहेत. या संघाने भरवलेले ४७वे अंकुर साहित्य संमेलन २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या संमेलनांसाठी अंकुर साहित्य संमेलन हा लेख पहा.
वऱ्हाडी साहित्य संमेलनसंपादन करा
अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन (आयोजक - अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच)
- पहिले संमेलन दिनांक 29 एप्रील 2018 स्थळ पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालय अकोला
संमेलनाचे अध्यक्ष - मा. पुष्पराज गावंडे, स्वागताध्यक्ष मा.ऊमेश मसने, उद्घाटक मा.प्रकाश पोहरे, प्रमुख पावने मा.तुकाराम बिरकड, मा.श्रीकांतदादा पीसे , मा.शिरीषभाऊ धोत्रे , मा.सुरेश पाचकवडे, मा.अशोक पटोकार
- दुसरे संमेलन 2 व 3 जून 2019, मराठा मंगल कार्यालय, अकोला संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे स्वागताध्यक्ष डॉ.धनंजय दातार, उद्घाटक विठ्ठल वाघ, प्रमुख पावने हर्षवर्धन देशमुख, डॉ.रणजीत सपकाळ, संदीप भारंबे, डॉ. श्रीकांत तिडके, मा.ऋषिकेश पोहरे , डॉ.मोना चिमोटे, दिनकर दाभाडे, सौ. वंदना दातार, सौ. साधना पोहरे, पुष्पराज गावंडे, श्याम ठक, चित्रपट अभिनेता भारत गणेशपुरे, आणि अभिनेता अमीत्रियान पाटील
- तिसरे संमेलन 4 जाने. 2020, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती . संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे, स्वागताध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर (कुलगुरू, सं.गा.अम.विद्यापीठ अमरावती ), उद्घाटक मधुकर वाकोडे, प्रमुख पावने - शिरीष धोत्रे , संदिप भारंबे, सौ.अनुराधा धामोडे, पुष्पराज गावंडे , प्रा.सदाशिव शेळके, डाॅ.मोना चिमोटे, श्याम ठक, डॉ.राजेश जयपुरकर
- नियोजित चौथे संमेलन डिसेंबर २०२२ संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ राजेश मिरगे, स्वागताध्यक्ष विनायक भारंबे, उद्घाटक : ना. राजेंद्र शिंगणे (मंत्री महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष नितीन वरणकार, प्रतापराव जाधव खासदार, आकाश फुंडकर, शकुंतला बुच नगराध्यक्ष शेगाव, पुष्पराज गावंडे, प्रकाश पोहरे
- आंबेडकरी साहित्य संमेलन:
- ९वे : वणी (जिल्हा [[यवतमाळ[[), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
- अधिक आंबेडकरी साहित्य संमेलनांसाठी पहा :आंबेडकरी साहित्य संमेलन
१३वे कामगार साहित्य संमेलन, अमरावती, २०-२१ जानेवारी २००६
- राज्यस्तरीय कृषि साहित्य संमेलन:
हे संमेलन प्रतिभा साहित्य संघ ही संस्था भरवते. असले संमेलन अकोट(जिल्हा अकोला) येथे १३-१-२०११ला भरले होते.
- ग्रामीण साहित्य संमेलन:
- १ले :
- २रे :
- ३रे : शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा); ७-१२-१९८७; संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
- ४थे : वैजापूर; संमेलनाध्यक्ष भारत सासणे
- ५वे :
- अखिल भारतीय जनसाहित्य संमेलन:
- ४थे : भंडारा
- विदर्भ जनसाहित्य संमेलन:
- १ले : ३१-३-१९८५
- २रे :
- ३रे :नरखेड(नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप
- विदर्भ जिल्हा साहित्य संमेलन:
- १७-१८ जानेवारी १९८७
- झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन:
- १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
- झाडीपट्टी साहित्य संमेलन:
- १ले : रेंगेपार(कोहळी)(तालुका लाखनी, जिल्हा भंडारा);१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले.
- ?वे : सेंदूरवाफा; १९९५ संमेलनाध्यक्ष कै.प्रा.द.सा.बोरकर
आजतागायत (इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.
- पद्मगंध साहित्य संमेलन
- अखिल भारतीय पद्मगंध साहित्य संमेलन, सावनेर (जिल्हा [[नागपूर[[) येथे झाले होते.
- प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
- १ले : बुलढाणा, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
- १ले :
- २रे : वरुड(जिल्हा अमरावती); २४-२५ फेब्रुवारी १९९६; संमेलनाध्यक्ष प्रा.या.बा. वडस्कर
- बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
- विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.
- रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर
- बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन
- बुलढाणा, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
- २रे : अमरावती; २६-५-२०१२; संमेलनाध्यक्ष प्रा.अरविंद माळी
- विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय लेखिका संमेलन
- १ले : भद्रावती (जिल्हा चंद्रपूर); तारीख ?; संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
- राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन
?वे : चंद्रपूर, २०/२१ एप्रिल २०१३, संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले
हेही पहासंपादन करा
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |