महात्मा फुले साहित्य संमेलन

महात्मा फुले साहित्य संमेलन या नावाचे एक संमेलन अमरावती येथील टाऊन हॉलमध्ये २६ मे २०१२ रोजी झाले. सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते प्रा. अरविंद माळी हे संमेलनाचे अध्यक्ष होते. विदर्भातले या प्रकारचे हे दुसरे संमेलन होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २००७ सालापासून महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी या गावी राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. ते संमेलन या महात्मा फुले साहित्य संमेलनाहून वेगळे आहे. ते प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने भरते

हे सुद्धा पहा

संपादन

मराठी साहित्य संमेलने ; दलित साहित्य संमेलन