प्रा. डो. किशोर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत.

त्यांनी डॉ. श.नु. पठाण यांच्या ’वेदना आणि प्रेरणा’ या आत्मचरित्राला एक दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे.

’साहित्य संमेलने लग्नासारखी उत्सवी होत आहेत’ या विषयावर दैनिक लोकमतने किशोर सानप्यांची मुलाखत घेऊन ती छापली होती. (७-१२-२०१२)

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी(पुणे), व आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वरांच्या ७१७व्या संजीवनसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या जागतिक सहिष्णुता सप्ता्हादरम्यान डॉ.किशोर सानप यांचे आळंदीला संतशिरोमणी तत्त्वज्ञ श्रीज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांचा भक्तिमार्ग याविषयावर निरूपण झाले.

किशोर सानप यांनी केलेली अध्यक्षीय भाषणे यू-ट्यूबवर सहा भागांत आहेत.

डाॅ. किशोर सानप हे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भरलेल्या २ऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

किशोर सानप यांची पुस्तकेसंपादन करा

 • ऋतू (कवितासंग्रह)
 • कोवळी पानगळ (वैचारिक)
 • तंट्या या कादंबरीविषयी (परीक्षण)
 • तुकाराम : व्यक्तित्व आणि कविता (सहलेखक मनोज तावडे)
 • दशक्रियाची उत्तरक्रिया (लेखसंग्रह)
 • देशीय वाद आणि मराठी साहित्य समीक्षा
 • पांगुळवाडा (कादंबरी)
 • प्रबोधन युगाची सांस्कृतिकता : आदिभारत ते आधुनिक भारत...
 • भूवैकुंठ
 • भाषा, समाज, साहित्य, संस्कृती : सत्त्व आणि मूल्य...
 • भालचंद्र नेमाडे यांची कविता
 • भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा
 • मराठी कविता : नव्या दिशा
 • मराठी कविता : नव्या वाटा
 • मराठी कादंबरी : नवी दिशा
 • मराठी कादंबरी : नैतिकता
 • मराठी कादंबरी : पाऊलखुणा
 • मराठी कादंबरीचे साहित्यशास्त्र (का.बा. मराठे/वि.का. राजवाडे/ भालचंद्र नेमाडे यांच्या मीमांसेच्या संदर्भात)
 • मराठीतील प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर
 • महाकवी संत तुकाराम दर्शन : खंड १ ते ५
 • मी अनादिचा अस्वस्थ गा (लघुकथासंग्रह)
 • युगपुरुष तुकाराम
 • रामदास फुटाणे यांची कविता : सामाजिक आणि राजकीय पडझडीचे सांस्कृतिक वर्तमान
 • रामदास फुटाणे यांची भाष्य कविता
 • लघुपत्रिकेतील कविता : प्रेरणा व स्वरूप
 • लेखकाची नैतिकता आणि सामाजिक उत्तरदायित्व (लेखकांवरील लेख आणि मुलाखती)
 • श्याम मनोहरांच्या कथा-कादंबऱ्या आणि नाटके : अज्ञात प्रेरणांचा शोध
 • श्याम मनोहर यांच्या कविता : शोध
 • संत तुकाराम रामदास, शिवाजी आणि दादोजी कोंडदेव ( संत तुकाराम,रामदास,शिवाजी आणि दादोजी कोंडदेव यांच्या संबंधावर प्रकाशझोत )...
 • संत साहित्य : अंतःप्रवाहाचे स्वरूप (संत साहित्यविषयक विविध लेखांचे आणि भाषणाचे संकलन)
 • समकालीन ग्रंथनिर्मिती : ....
 • समकालीन मराठी कविता आणि जागतिकीकरण
 • समकालीन समीक्षा : जाणिवा आणि भाष्य (प्रकाशन - १-५-२०१५)
 • समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या (मेघना पेठे, कविता महाजन आणि अरुणा सबाने यांच्या कादंबऱ्यांचे समीक्षण) (२०१२)
 • समग्र तुकाराम दर्शन
 • समांतर ग्रंथ निर्मिती : दखल आणि भाष्य
 • साठोत्तरी मराठी कविता आणि देशीयता
 • साठोत्तरी मराठी कादंबरी : मूल्यनिर्मितीच्या दिशा
 • सांस्कृतिक वर्तमान (समकालीन समाज, साहित्य, संस्कृती, राजकारण आदी घडामोडींवर केलेले भाष्य)
 • हारास (कादंबरी)

डॉ. किशोर सानप यांच्या विषयीची पुस्तकेसंपादन करा

 • डॉ.शेषराव जुडे यानी, 'किशोर सानप यांचे ललित आणि समीक्षा वाड्मय : एक चिकित्सक अभ्यास’ या संशोधन विषयावरील पीएच.डी.साठी लिहिलेला प्रबंध
 • किशोर सानप यांचे वाड्मय : एक आकलन (लेखक डॉ.शेषराव जुडे)

सन्मान, पुरस्कारसंपादन करा

 • आसगाव तर्फे पवनी येथे ११-१-२०१४ला झालेल्या २१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान.
 • गोंदिया येथे ७-८-९ डिसेंबर २०१२ या काळात झालेल्या ६२व्या विदरभ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 • अमरावतीच्या मातोश्री सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ’साहित्यव्रती २०१५’ हा पुरस्कार (१२-१-२०१५)(अपूर्ण)