विक्रम नाथ
विक्रम नाथ (२४ सप्टेंबर, १९६२:कौशंबी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. याआधी ते गुजरात उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश [१] [२] आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली होती परंतु केंद्र सरकारने या शिफारसी नाकारल्या. [३] २०२० च्या कोव्हिड-१९ साथीच्या काळात यूट्यूबवर आपल्या न्यायालययाची कार्यवाही थेट प्रसारितत करणारे ते भारतातील उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत.
विक्रम नाथ | |
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
| |
कार्यकाळ ३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत | |
पुढील | विद्यमान |
---|---|
सुचविणारे | एन.व्ही. रमणा |
नेमणारे | राम नाथ कोविंद |
कार्यकाळ १० सप्टेंबर, २०१९ – ३० ऑगस्ट, २०२१ | |
सुचविणारे | रंजन गोगोई |
नेमणारे | राम नाथ कोविंद |
कार्यकाळ २४ सप्टेंबर, २००४ – ९ सप्टेंबर, २०१९ | |
सुचविणारे | रमेश चंद्र लाहोटी |
नेमणारे | ए.पी.जे. अब्दुल कलाम |
जन्म | २४ सप्टेंबर, १९६२ कौशंबी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पत्नी | संगीता श्रीवास्तव |
अपत्ये | विश्वेश नाथ, वरद नाथ |
शिक्षण | कायदा पदवी |
३१ ऑगस्ट, २०२१ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी वर्णी लागली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या निवृत्तीनंतर ते २०२७ मध्ये भारताचे सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत. [४]
संदर्भ
संपादन- ^ Singh, Ajmer (2019-08-31). "Collegium clears Vikram Nath's name for Gujarat High Court Chief Justice". The Economic Times. 2019-09-02 रोजी पाहिले.
- ^ "Orders of appointment of Shri Justice Vikram Nath, Judge of Allahabad High Court, to be CJ of Gujarat High Court (08.09.2019)" (PDF). 8 September 2019. 8 September 2019 रोजी पाहिले.
- ^ Emmanuel, Meera (10 April 2019). "Collegium recommends Justice Vikram Nath as First Chief Justice of Andhra Pradesh HC". Bar & Bench. 10 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Next 9 Chief Justices of India". Supreme Court Observer (इंग्रजी भाषेत). 2023-03-12 रोजी पाहिले.