विकिपीडिया चर्चा:प्रचालक विनंती मार्गदर्शन

आता पर्यंत झालेल्या आणि पुढील चर्चा असावे आणि असेलतर बरे यात विभागाव्यात

नमस्कार,

प्रसन्नकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मी प्रचालकपदाला जरुरी अशा काही लक्षणांची यादी केली. ही मला वाटणारी व आठवणारी लक्षणे आहेत. जसे कृष्णाने अर्जुनास स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली होती तशी तुम्ही (मराठी विकिपीडिया संपादकगण) आम्हास (मराठी विकिपीडिया संपादकगण) ही सांगावीत ही विनंती. माझी यादी येथे दिली आहे. यात तुमची भर घालावी ही विनंती -

  • मराठी विकिपीडियावर बराच काळ (वर्षभर किंवा जास्त) कार्यरत असणे
  • एकंदर विकिपीडिया व मीडियाविकिवरील नियम व कार्यपद्धतीची माहिती असणे
  • क्लिष्ट साचे, वर्गवारी व तत्सम गोष्टींची माहिती असणे व ही माहिती इतरांना देणे
  • तेथील नेहमीच्या सदस्यांशी मेळ घालून अनेक छोटे उपप्रकल्प पार पाडणे
  • येथील लिखित व अलिखित नियमांची जाण असणे व ते लागू करण्यात पक्षपात किंवा भीड/लाज/भीती न बाळगणे
  • स्वतःवर करण्यात आलेली टीका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे
  • कितीही उद्धट, उर्मट व अविवेकी संदेशांना शांतपणे नियमांनुसार उत्तरे देणे
  • मराठी विकिपीडिया हा मराठीभाषकांची संपत्ती असून त्यांचा निर्णय अंतिम असतो याची जाण असणे

अभय नातू ०४:१७, ११ जुलै २०१० (UTC)

मला वाटते येणाऱ्या काळात प्रचालक पदासाठी समर्थन देताना सदस्यांनी प्रचालक पदासाठी विनंती करणारे सदस्यांचे योगदान अभ्यासताना खालील गोष्टी लक्षात घेतल्यास विकिपीडिया संस्कृतीच्या संवर्धनास हातभार लागेल. माहितगार ०७:२१, १२ जुलै २०१० (UTC)
  1. सदस्यास येथील विकिपीडिया:नामविश्व संकल्पनेचा परिचय झाला आहेका अथवा त्यांची सर्व नामविश्वातून त्यांना त्या नामविश्वातील संकेतांचे आणि उपयोगितेचे आकलन झाले आहे का खास करून:
    1. मुख्य लेख नाविश्वाच्यादृष्टीने शीर्षकलेखन संकेतांचा सर्वसाधारण परिचय झालेला असावा त्या अनुषंगाने पुर्ननिर्देशन , स्थानांतरण, नि:संदीग्धीकरण कार्याचा परिचय झालेला असावा असे काम केलेले असावे.
    2. पुरेशी प्रताधिकार सजगता असावी.
    3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघाची जाणीव
    4. विकिपीडिया लेखांच्या विकिकरणाचा अनुभव असावा.शुद्धलेखन/शुद्धलेखन विनंत्या,पुर्नलेखन,बदल,पानकाढा, संदर्भ विनंत्या करणे त्या अनुषांगाने चर्चांचा अनुभव असणे
    5. विकिपीडिया:प्रचालक/कामे या संदर्भाने विकिपीडिया:नामविश्व, विकिपीडिया:निर्वाह, विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन ; विकिपीडिया:कारण ; विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी, विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ; विकिपीडिया:पहारा आणि गस्त या गोष्टींशी परिचीत असावे
  2. इतर नामविश्वात वर्ग: साचा: नामविश्वात किमान स्वरूपाचे काम झाले असावे,तसेच साचे कसे काम करतात आणि साचात शुद्धलेखनादी दुरूस्त्या करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याचे किमान स्वरूपी आकलन असावे.
    1. इतर मुख्यनामविश्वातील लेखचर्चा सदरातून तसेच सदस्य चर्चा सदरातून नवीन सदस्यांचे शंका निरसन मार्गदर्शन करण्याचा अनुभव असावा.
    2. विकिपीडियाचे इतर सहप्रकल्प खासकरुन कॉमन्स, ट्रान्सलेट विकि यांचा परिचय असावा
    3. मिडियाविकि नामविश्वातील सुधारणा चर्चेत सहभाग घेतला असेल तर चांगले
  3. स्टॅटीक आणि डायनॅमीक अंकपत्त्यातील फरक माहित असणे गरजेचे आहे.

असावे/असलेतर बरे

संपादन

मराठी विकिपीडियावर सहाय्य देताना जाणवलेल्या गोष्टींवरून खालील गोष्टी सुचवाव्याशा वाटतात माहितगार १४:२९, १६ जुलै २०१० (UTC)

  • केवळ पहार्‍याचा आणि क्लिन अपचाच नाहीतर किमान दहा पाने अथवा वीस परिच्छेद विश्वकोशिय परिघात लिहिण्याचा अनुभव उद्देश लेखन करणाऱ्यांचा प्रत्यक्ष अडचणीचा अनुभव असावा
  • किमान दोन लेखांचे अथवा दहा परिच्छेदांचे भाषांतर केले असावे. उद्देश लेखन करणाऱ्यांचा प्रत्यक्ष अडचणीचा अनुभव असावा
  • मराठी विकिपीडिया करिता किमान एका पानचे अथवा तेवढ्या मजकुराचे सहाय्य पान भाषांतरीत करावे.
  • सदस्यचर्चा पानांवर आणि मदत केंद्रावर सहाय्य पुरवण्याचा अनुभव असावा.
  • प्रचालक झाल्यानंतर ट्रान्सलेट विकिशी जुळवून घेणे प्रचालकांना अवघड वाटत असावे यामुळे मिडियाविकि संदेशांचे मराठी विकिपीडियावरच भाषांतर करण्याचा कल दिसून येतो. त्या शिवाय विकिसंज्ञा एकमेकांशी न जुळण्याची (शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वापरले जाण्याची शक्यता संभावते) हे पहाता नवीन प्रचालक इच्छूकांचे ट्रान्सलेट विकित किमान पनास संपादने पार पडली असावीत.
  • विकिमिडिया कॉमन्सवर किमान दहा चित्रे चढवण्या अनुभव असावा
  • विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट मध्ये प्रत्येकी किमान दहा संपादने झाली असावीत (उद्देश सहप्रकल्पांच्या व्याप्तीचा अनुभव यावा)
Return to the project page "प्रचालक विनंती मार्गदर्शन".