विकिपीडिया:मासिक सदर/ऑगस्ट २००८

मुखपृष्ठ सदर लेख
वाघ
वाघ

वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात.मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात.

वाघाचे खरे माहेरघर हे पूर्व सायबेरियातील जंगलात मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. आज प्रामुख्याने जंगली वाघ हा भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीनरशिया या देशात आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर सर्वत्र पोहोचले आहेत व वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहे. जंगली वाघातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत.

वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झ़ाला असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.

भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत --

  1. हिमालयतराई विभाग - जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम अरुणाचल प्रदेश व इशान्य भारतातील राज्ये.
  2. अरावली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगल.
  3. सुंदरबनओरिसा.
  4. मध्य भारतातील पानगळी जंगल. येथे वाघांचे सर्वाधिक अस्तित्त्व आढळते - कान्हा, बांधवगड, मेळघाट(गुगमाळ्), ताडोबा राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये.
  5. सह्याद्रीमलबार किनारा - सह्याद्रीचा दक्षिण भाग, बंदीपूर, मदुमलाई पेरियार, इ. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.

पुढे वाचा...