विकिपीडिया:कौल/आयातदार


हे पान, विकिपीडिया:आयातदारच्या नामनिर्देशन विनंतीसाठी सर्व सदस्यांकडून कौल घेण्याकरीता आहे.

@अभय नातू आणि V.narsikar: प्रतवारीच्या धोरणांची चर्चा पुढे जात आहे तशी मला अनेक साचे आणि महत्वाची पाने आयात करून भाषांतर करून मराठीवर आणण्याची गरज भासत आहे, तेव्हा एकतर मला आयातदार हे अधिकार देण्यात यावेत किंवा आपणांपैंकी कोणीतरी आवश्यक साचे मराठीवर आयात करावेत पुढे ते मी भाषांतरीत करण्याची आणि एकत्र रचण्याची जबाबदारी घेईनच. अनेक इतर अवजारेही ह्या द्वारे मराठीवर आणता येतील जसे की ट्रींकल. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १०:११, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

तुम्हाला कोणते साचे आणि पाने येथे आणायची आहेत? त्यांची यादी आहे का?
मला वाटते काही महिन्यांपूर्वी @Tiven2240: यांनी काही साचे आयात केले होते. त्याप्रकारे तुम्हाला आणायचे आहेत का?
तुम्हाला साचे आयात करण्याबाबत पूर्वीचा अनुभव किंवा माहिती (असे करताना काय करावे, काय करू नये, इ.) आहे का?
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:२१, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
वाचले. मला साद दिल्याबद्दल धन्यवाद. अभयनी विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करावा तसेच अभय यात लक्ष देत असल्यामुळे मी काही टिका-टिप्पणी करणे योग्य नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) १२:०४, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: येथील काही साचे, १) २) आणि बरेच आहे. आणि हे साचे मराठी नावनी आणणे महत्वाचे आहे, त्यामुळे ते मराठी निट येत असलेल्या सदस्याने केलेले चांगले. इतरांचे मला नक्की माहित् नाही पण अनेकदा, नरसीकरदादा जेव्हा आयात करतात तेव्हा त्यात आयात केले असे दिसले तेव्हाच मी तपास केला असता लक्षात आले हा वेगळा सदस्य गट आहे. आणि या अधिकाराने साचे बिनचुक आयात होऊ शकतात. शिवाय भाषांतर मी करतोच. काही साचे मी स्त्रोत घेऊन तयार केलेले आहेतच.

इतर कोणी मराठी शिर्षक देऊन, आणि भाषांतर योग्य करुन एवढ्या मोठ्या प्रमाणावर साचे मराठीत आणणार असेल तर त्यांनी खुशाल आणावेत, त्या परिस्थितीत असे अधिकार मला देण्याची गरज भासणार नाही. मला हे अधिकार मागण्याची गरज पडली कारण मला अनेक साचे आणायचे आहेत, जे पानाच्या रखरखावासाठी वापरले जातात. शिवाय कोंबडी आधी का अंडे हा प्रश्न आहेच की, मराठी वाले शिकणार कुठे? आणि काही दिवसासाठी म्हणजे एक महिना वगैरेसाठी सुद्धा हे अधिकार देऊन मग त्याचा पुर्नविचार करता येईल की.   QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:१०, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

नोंद म्हणून:इनलाईन क्लीनअप टेम्प्लेट याला प्रचालक/सांगकाम्या/संपादक स्रोतातून आयात करू शकतात. ट्विनकल विषयी चर्चा साठी कृपया इथे पहा --Tiven2240 (चर्चा) १२:२२, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
@Tiven2240:,
तुमच्या वरील नोंदीचा अधिक खुलासा करावा किंवा त्याचे एक उदाहरण द्यावे.
@QueerEcofeminist:,
प्रश्न विचारण्याचे कारण तुमच्या ऐवजी इतर कोणी हे साचे आयात करावे हे नाही तर इतरांनी केलेल्या कामाचा संदर्भ घेउन त्यावरुन शिकून पुढील पाउल उचलण्याची सूचना करणे हा आहे. Tiven2240 यांच्या खुलाशाने होत नसेल तर तुम्हाला काही काळापुरता हा अधिकार द्यावा असे मी मांडत आहे.
अभय नातू (चर्चा) १०:५२, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
ता.क. -- ते मराठी निट येत असलेल्या सदस्याने... -- निट??? :-D हलकेच घ्यावे.....मराठी नीट येणाऱ्यांच्याही अनवधानाने शुद्धलेखनात चुका होतात हे मला माहिती आहे.


@अभय नातू: कोणी मराठी शिर्षक देऊन, आणि भाषांतर योग्य करुन एवढ्या मोठ्या प्रमाणावर साचे मराठीत आणणार असेल तर त्यांनी खुशाल आणावेत, हेच होत नसल्यामुळे मी अधिकार मागत आहे, परत साच्यांची मराठी नावे आणि पानांचे स्थलांतर, पुन्हा पुर्ननिर्देशने आणि ती हटवत बसायचे प्रचालकी काम अशी साखळी सुरू होते.
अर्थात मी काय म्हणतोय हे आपल्याला लक्षात आले असेल अशी अपेक्षा!!!QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:०९, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

प्रिय सदस्यांना माहिती नसावी की विशेष:आयात यांनी आयात केलेली साचे मराठी शिर्षकसह आयात केली जाऊ शकत नाही. जे काही आयात होते ते फक्त इंग्लिश भाषेत होते. मराठी विकिपीडियावर सद्या ते एका धोरण विषयावर असलेली साचे आयात करण्यास परवानगी मांगत आहे. कदाचित त्यांना माहिती नसावी की प्रतवारीच्या धोरणांची साचे मराठी विकिपीडियावर उपलब्ध आहेत. ती साचे प्रचालक V.narsikar आणि माहितगार यांनी पूर्वीच आयात केली आहेत उद्धा. {{Class}}, {{Articles by Quality}}इत्यादी व जे काही बाकी होते IUCN वाले साचे ते मी आयात केली आहेत उद्धा. {{IUCN2008}}{{IUCN2010.1}} इत्यादी . QueerEcofeminist हे मराठी विकिपीडियावर ट्विनकल संबंधीत साचे आयात करायला परवानगी मांगत आहेत त्याविषयी चर्चा झालेली आहे की ते उपकरणची गरज सद्या मराठी विकिपीडियावर नाही. ही विनंती इथे बंद करावी अशी मागणी, सद्या विकिपीडिया:आयातदार धोरण प्रमाणे केवळ विशिष्ट समुदायाच्या मान्यता चर्चेनंतर केवळ प्रतिपालक विश्वसनीय सदयाना हा अधिकार देतात. समुदायाचा मत वरील दुवेत आहे, साचेचे उत्पात करून अवरोध झालेले सदस्याला साचेचे आयात करणे विश्वसनीय सदस्य मी तर म्हणत नाही. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:१९, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

मी माझे अपेक्षित काम आधीच ह्या वाक्यात नोंदवलेले आहे, येथील काही साचे, १) २) आणि बरेच आहे. मी प्रतवारीच्या साच्यांविषयी बोललेलोच नाहीये, शिवाय अनेक इतर बाबी आहेत ज्या आणता येतील.

  • शिवाय साच्याच्या गैरवापरा मूळे टायविन यांनी अधिकाराच्या गैरवापरामुळे मला अवरुद्ध केले गेले होते, आणि या आणि अशाच वागणूकीमुळे टायविन यांनी विकीसमूदायाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांनी विश्वासाविषयी बोलूच नये.

मला कळत नाही की दरवेळी वर अधिकार द्यायची चर्चा संपून तीच्या वापराची चर्चा सुरू झालेली असताना टायविन यांच्या पोटात का दुखायला लागते? @सुबोध कुलकर्णी, V.narsikar, Pushkar Ekbote, आणि आर्या जोशी: आपले हे अधिकार मला मिळण्याविषयी काय मत आहे? QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:४३, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

पुन्हा एकदा: व्यक्तिगत हल्ले करू नये. हे दोन दिवसात दुसरी वेळी ते करत आहेत. @अभय नातू: कृपया याची नोंद घ्यावी --Tiven2240 (चर्चा) १४:४४, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि V.narsikar:,एखादा चांगले योगदान करणारा सदस्य विकीच्या उन्नतीसाठी काही नवीन गोष्टी शिकण्याची तयारी दाखवत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक मदत करणे हे प्रचालकांचे कर्तव्य आहे असे मला वाटते. शिवाय नेहमीच, येथे माणसे नाहीत असा सूर असतो. अशा परिस्थितीत आपल्यासारख्या अनुभवी सदस्यांनी नवीन फळी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. QueerEcofeminist यांना संधी द्यावी आणि पुढील मार्गदर्शन करावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:५७, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि V.narsikar: * आयतदार आणि निरिक्षक असे दोन्हींही अधिकार चर्चा होऊन, मान्य होऊनही अजुनही प्रत्यक्षात मला मिळालेलेच नाहीत. ही फ़क्त एक आठवण आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १९:०३, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

मान्य झाल्याचा कौल दिसला नाही. कृपया दुवा द्यावा.
अभय नातू (चर्चा) ११:०७, १६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]