वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष

(वायएसआर काँग्रेस पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)
वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
पक्षाध्यक्ष वाय.एस. जगनमोहन रेड्डी
लोकसभेमधील पक्षनेता मेकपती राजामोहन
स्थापना १२ मार्च २०११
मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा
लोकसभेमधील जागा
९ / ५४५
राज्यसभेमधील जागा
० / २४५
विधानसभेमधील जागा
६७ / १७५
(आंध्र प्रदेश)
२ / ११९
(तेलंगणा)
संकेतस्थळ ysrcongress.com

वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (तेलुगू: వై యస్ ఆర్ కాంగ్రెస్ పార్టీ) तथा युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पक्ष हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ह्या पक्षाची स्थापना २००९ मध्ये शिवकुमारने केली होती. २०११ साली आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचा मुलगा वाय.एस. जगनमोहन रेड्डीने हा पक्ष अंगिकारला व त्याचे सर्वेसर्वा पद धारण केले. वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष प्रामुख्याने आंध्र प्रदेशतेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत आहे.

भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेत वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे ९ खासदार आहेत. तसेच ६७ आमदारसंख्या असलेला वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.

बाह्य दुवे

संपादन