वडा-पाव

महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ
(वडापाव या पानावरून पुनर्निर्देशित)

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते). रोहित शर्मा ह्या खेळाडु ला वडापाव अतिशय प्रिय आहे.

मुंबईतला अतिशय लोकप्रिय वडा पाव

इतिहाससंपादन करा

वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये देखील वडापावची लोकप्रियता भरपूर आहे. [१]

थोडक्यात कृतीसंपादन करा

 
वडा-पाव
 
वडा-पाव तळताना

ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव.

वडा करण्याची सर्वसाधारण कृती:

  • सोनेरी रंग झाला की वडे तयार झाले असे समजावे. वडे कढईतून काढताना अतिरिक्त तेल नितळू द्यावे. स्वछ टीप कागदावर वडे काढल्यास अतिरिक्त तेल कागदात शोषले जाते.
  • पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "कसा लागला वडापावचा शोध...वाचा InfoMarathi » Info Marathi". Info Marathi (इंग्रजी भाषेत). 2019-08-11 रोजी पाहिले.