लसूण
लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. लसूण हा शब्द मराठीत पुंल्लिंगी आहे, पण लसणाच्या पाकळीला लसणी (स्त्रीलिंगी) म्हणतात.
प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
(हिंदी -. लसन, लहसुन; गुजराती - लसण; कानडी - बेळुवळ्ळी; संस्कृत - लशुनम्, उग्रगंधा, सोनह, रसोन; इंग्रजी - गार्लिक; लॅटिन - ॲलियम सटायव्हम-कुल-लिलिएसी Liliaceae आहे). ही ओषधीय वनस्पती कांदा व खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) असून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात. इ.स.पू. ५००० ते ३४०० या काळात इजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. यूरोप, रूमानिया व इजिप्त येथे तिचे देशीयभवन (निसर्गाशी पूर्णपणे जमवून घेऊन सुस्थिर होणे) झाले आहे.
लसूण खण्याचे फायदे
संपादनछातीवर व पोटावर लसणीचे तेल चोळल्यानेसुद्धा वेदना कमी होतात.
लसूण वृष्य असल्याने शुक्रजननाचे कार्य करते. कामोत्तेजना वाढविण्यासाठी लसणीचा उपयोग होतो.
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी अंगावर साफ जात नसल्यास लसणीचा उपयोग होतो.
अस्थिभंगामध्ये हाडे जुळवून आणण्यासाठी लसूणसिद्ध दूध अत्यंत उपयुक्त आहे.
ज्यामध्ये त्वचा कुजण्याची वा सडण्याची क्रिया होते, अशा त्वचाविकारात लसूण उपयुक्त ठरते. लसूण व मिरे वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये पडलेले किडे मरून जातात.
लसूण वाटून हळद व गूळ एकत्र करून मुका मार बसलेल्या जागी लेप लावावा. म्हणजे सूज लवकर उतरून वेदना कमी होते.
लसूण वाटून हुंगायला दिल्याने मुर्छा आली असल्यास ती जाते
भारतादि अनेक पौर्वात्य देशांत लसूण मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. तो मूळची भारतीय नसल्याने वैदिक वाङ्मयात लसणाचा उल्लेख नाही, तथापि महाभारतात (आरण्यक पर्वात) कांदा व लसूण यांचा उल्लेख आलेला आहे. तसेच कौटिलीय अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, भावनीतक, मनुस्मृती इत्यादी अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांत निरनिराळ्या संदर्भांत लसणाचे उल्लेख आढळतात. लसणाच्या निश्चित मूलस्थानाबद्दल मतभेद आहेत, मात्र अनेक धर्मग्रंथांत लसूण अपवित्र, निषिद्ध व त्याज्य मानलेला आढळतो. तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांची माहितीही भरपूर मिळते. काश्यपसंहितेइतकी माहिती इतरत्र आढळत नाही.
लसूण खातां मधूमेह, चरबी जाई दूर |
हृदयरोग, मुत्रविकाराची नसते टूरटूर ||
खाद्यपदार्थ
संपादनआख्यायिका
संपादनलसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!
समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले .... अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला....
तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला .....
गंमतीशीर आहे पण घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट अनेकांना आजही जशीच्या तशी आठवते ....
लसूण खरोखरच अमृत असावा असे म्हणावे लागते.
गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा हा एकमेव कंद आहे ...
संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा.
लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे. हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
७. भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
१०. लसूण घालून उकळलेले दूध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
११. लसूण मनाची मरगळ घालवतो .
१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दूध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
१३ . लसणामध्ये नैसर्गिकरीत्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणाऱ्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो.
काळजी :
संपादनलसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती,गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे.
जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजल्यास बरे वाटते.