Disambig-dark.svg
कांदा

कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते, परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.याची भाजी पण करतात.कांद्याच्या पातीचा झुणका पण होतो. तो खूप छान लागतो. कांद्याची लागवड कमीतकमी ७,००० वर्षांपासून निवडक पद्धतीने केली जाते. कांदा ही द्वैवार्षिक वनस्पती आहे, परंतु सामान्यत: वार्षिक म्हणून घेतले जाते. कांद्याच्या आधुनिक जाती साधारणतः 15 ते 45 सेमी (6 ते 18 इंच) उंचीपर्यंत वाढतात. कांद्याची पाने पिवळसर- हिरव्या निळ्या रंगाची असतात आणि ती चपट्या, पंखाच्या आकाराच्या गुंडाळणीमध्ये एकट्याने वाढतात. ते चपटे, पोकळ आणि दंडगोलाकार असतात. कांदा परिपक्व होताना, त्याच्या पानांचा तळ आणि त्याच्या कंदामध्ये अन्न साठा जमा होण्यास सुरवात होते. का़दा भारतातून अनेक देशात निर्यात होतो, जसे की नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, इत्यादि। कांदा याचे पीक कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल मध्य प्रदेश अशा जागी कांदा प्रक्रिया करुन कांद्याची भुकटी बनवली जाते. वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा आहे. भारतात महाराष्ट्रात कांद्याची शेती सर्वात जास्त होते. येथे वर्षातून दोन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते- एक नोव्हंबर आणि दूसरे मे महीन्याच्या जवळ पास. कांद्याची शेती कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल मध्य प्रदेश अशा जागांवर वेगळ्या वेगळ्या वेळेत तयार होते. जगात कांद्याची शेती 1,789 हजार हेक्टर क्षेत्रफळावर घेतली जाते. ज्यात 25,387 हजार मी. टन उत्पादन होते. भारतात ऐकून 287 हजार हेक्टर क्षेत्रफळावर पीक घेतल्या वर 2450 हजार टन उत्पादन प्राप्त होते. महाराष्ट्र, उड़ीसा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिलनाडु आणि गुजरात इत्यादी प्रदेशात जास्त प्रमाणात घेतले जाते.

कांदा हे भारतातील एका महत्त्वाचे पीक आहे.

कांदा पीकसंपादन करा

लागवडसंपादन करा

सूक्ष्म अन्नद्रव्याअभावी होणारे परिणामसंपादन करा

  • 'तांबे' या सूक्ष्म द्रव्याअभावी कांदे कडक न राहता मऊ पडतात.त्यावरील पापुद्रा ठिसूळ व फिकट पिवळा पडून गळतो.
  • 'बोरॉन' या सूक्ष्म द्रव्या अभावी रोपाची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा व क्वचित निळसर होतो.
  • 'झिंक' या सूक्ष्म द्रव्या अभावी पाने जाड होतात. ती खालचे बाजूस वाकतात. पानावर रंगीत चट्टे दिसतात.

खतेसंपादन करा

जैविक खतेसंपादन करा

कांदा पीक उत्पादन घेतांना जमिनीचं स्वास्थ नीट ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रासायनिकखते आणि सेंद्रिय खत यांची सांगड घालणे गरजेचे आहे.

रासायनिक खतेसंपादन करा

खरीप कांद्याला एकरी ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश या प्रमाणात तर रब्बी कांदा पिकाला एकरी ४०:२०:३३ किलो नत्र,स्फुरद, पालाश वापर करावा तर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये गंधक १० किलो प्रति एकर लागवडीला वापरावे गंधक वापरल्याने कांदा साठवणुकीस चांगला होतो व टिकण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सल्फेट १० किलो , झिंक सल्फेट ८ किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात ८ ते दहा दिवस मुरवून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परिक्षणानुसार निर्णय घ्यावा.

काढणीसंपादन करा

विविध जातीसंपादन करा

संदर्भसंपादन करा