लोहा विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
लोहा विधानसभा मतदारसंघ - ८८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लोहा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या १. लोहा तालुक्यातील मालाकोळी, कलांबर, कापसी बुद्रुक, लोहा ही महसूल मंडळे आणि लोहा नगरपालिका, २. कंधार तालुक्यातील उस्मान नगर, बारुळ, कंधार ही महसूल मंडळे आणि कंधार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. लोहा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर दगडुजी शिंदे हे लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | श्यामसुंदर दगडुजी शिंदे | शेतकरी कामगार पक्ष | |
२०१४ | प्रतापराव चिखलीकर | शिवसेना | |
२००९ | शंकर(अण्णा) धोंडगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
लोहा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शंकरराव गणेशराव धोंडगे | राष्ट्रवादी | ८१५३९ |
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर | लोक भारती | ७२१७५ |
प्रा. मनोहर बाबाराव धोंडे | शिवसेना | ७०८७ |
शहाजी संभाजी उमरेकर | अपक्ष | १९९९ |
रुपकुमार नारायणराव कांबळे | अपक्ष | १८०७ |
नरंगले शिवाकुमार नारायणराव | मनसे | १७६५ |
GAIKWAD NARENDRA BABARAO | बसपा | १६९६ |
बारोळे व्यंकटराव किशनजी | अपक्ष | १५०७ |
सुनिता रामराव राठोड | अपक्ष | १३९६ |
ADAMPURE BALAJI GOVINDA | अपक्ष | ११०६ |
HAMBILKAR VITTHAL PUNDA | भाबम | ४५२ |
नवघरे आनंदराव पांडुरंग | राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टी | ३४८ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |