रुद्रप्रयाग
(रूद्रप्रयाग या पानावरून पुनर्निर्देशित)
रुद्रप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर व रुद्रप्रयाग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले रुद्रप्रयाग अलकनंदा व मंदाकिनी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या १८० किमी पूर्वेस स्थित आहे.
रुद्रप्रयाग | |
भारतामधील शहर | |
अलकनंदा व मंदाकिनी नद्यांच्या संगमावरील रुद्रप्रयाग |
|
देश | भारत |
राज्य | उत्तराखंड |
जिल्हा | रुद्रप्रयाग जिल्हा |
क्षेत्रफळ | ३ चौ. किमी (१.२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,९३६ फूट (८९५ मी) |
लोकसंख्या (२००१) | |
- शहर | २,२४२ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
राष्ट्रीय महामार्ग ५८ रुद्रप्रयागमधून जातो. रुद्र्प्रयागहून गौरीकुंड व केदारनाथकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग १०९ उपलब्ध आहे. २०१३ साली आलेल्या महापुरामध्ये रुद्रप्रयागचे प्रचंड नुकसान झाले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत