राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपट

ナショナル・フィルム・アワード 最優秀アッサム語長編映画賞 (ja); National Film Award/Bester Film in Assamesisch (de); National Film Award for Best Feature Film in Assamese (en); অসমীয়া ভাষাৰ শ্ৰেষ্ঠ ছবিৰ ৰাষ্ট্ৰীয় বঁটা (as); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपट (mr); অসমীয়া ভাষার শ্রেষ্ঠ চলচ্চিত্রের রাষ্ট্রীয় পদক (bn) Wikimedia list article (en); অসমীয়া ভাষাৰ শ্ৰেষ্ঠ ছবিৰ ৰাষ্ট্ৰীয় বঁটা প্ৰাপ্ত ছবি সমূহৰ তালিকা (as); Wikimedia list article (en); Վիքիմեդիայի նախագծի ցանկ-հոդված (hy); стаття-список у проєкті Вікімедіа (uk); চলচ্চিত্র উৎসব অধিদপ্তর কর্তৃক প্রদত্ত একটি বার্ষিক পুরষ্কার (bn) ナショナル・フィルム・アワード アッサム語長編映画賞 (ja)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[] हा पुरस्कार असमीया भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपट 
Wikimedia list article
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,
पुरस्काराची श्रेणी
ह्याचा भागराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
प्रायोजक
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले. असमीया भाषेतील चित्रपटांना सप्टेंबर १९५६ मध्ये झालेल्या ३ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांपासून पुरस्कार देण्यात आले. तथापि, या चित्रपटामध्ये राष्ट्रपतींच्या रौप्य पदकासाठी कोणताही चित्रपट योग्य नसल्याचे दिसून आले. फणी सरमा दिग्दर्शित पियली फुकन या चित्रपटला प्रथम प्रमाणपत्र देण्यात आले. १९५८ च्या सहाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये निप बरुआ दिग्दर्शित रोंगा पोलिस हा चित्रपट असमीयातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचा रौप्य पदक मिळवणारा पहिला चित्रपट ठरला.

भबेंद्र नाथ साईकिया आणि जाह्नू बरुआ दिग्दर्शित सात चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. 25 ऑक्टोबर 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "National Awards 2015, as it happened: Winners, wishes and morel". इंडिया टुडे. 3 मे 2015. 23 मे 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 मे 2015 रोजी पाहिले.