वांद्रे-वरळी सागरी सेतू

(राजीव गांधी सागरी सेतू या पानावरून पुनर्निर्देशित)


वांद्रे-वरळी सागरी सेतू (Bandra–Worli Sea Link) हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. अरबी समुद्रावर बांधला गेलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून याची योजना डी.ए.आर. कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केली. ह्या पूलाच्या बांधकामासाठी ₹ १,६०० कोटी इतका खर्च आला असून ३० जून २००९ रोजी वांद्रे-वरळी सेतू वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उत्तर टोकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुरुवात होते.

वांद्रे-वरळी सागरी सेतू
मुंबईच्या नकाशावर वांद्रे-वरळी सागरी सेतू
वरळीचे दृष्य
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ५.६ किलोमीटर (३.५ मैल)
सुरुवात वांद्रे
शेवट वरळी
स्थान
शहरे मुंबई
राज्ये महाराष्ट्र

हा पूल बांधण्याअगोदर वांद्र्याहून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी माहिम कॉजवे हा एकमेव मार्ग होता. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावरून वरळीपर्यंत पोचायला ६०-९० मिनिटांचा कालावधी लागत असे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अरबी समुद्रावर पूल बांधण्याचे ठरवले व १९९९ साली दिवंगत हिंदूहृदयसम्राट बाळ ठाकरे ह्यांच्या हस्ते ह्या पूलाचा पायाभरणी सोहळा पार पडला. पाच वर्षे व ₹ ६६० कोटी इतका खर्च अपेक्षित असलेल्या ह्या पूलाच्या बांधकामामध्ये असंख्य अडथळे व विलंब आले. प्रकल्पाचा खर्च ६६० कोटीवरून १६०० कोटींवर पोचला व अखेरीस १० वर्षांच्या कालावधीनंतर वांद्रे-वरळी मार्ग बांधून पूर्ण झाला. हा पूल वापरण्यासाठी सर्व वाहनांना पथकर भरणे बंधनकारक आहे.

बाह्य दुवे

संपादन