राजकुमारी अमृत कौर

भारतीय राजकारणी

राजकुमारी अमृत कौर (२ फेब्रुवारी १८८९ - २ ऑक्टोबर १९६४) या भारत देशातील राजकारणी होत्या. त्या भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री होत्या. तसेच इ.स. १९५१-इ.स. १९५२ या काळात त्या केंद्रीय दूरसंचारमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.