पतियाळा

पंजाबमधील शहर, भारत


पातियाळा (पंजाबी: ਪਟਿਆਲਾ, स्थानिक उच्चार: पटियाला) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. पातियाळा शहर पंजाबच्या आग्नेय भागात राजधानी चंदिगढपासून ७० किमी तर दिल्लीहून २७० किमी अंतरावर वसले आहे. १७५४ साली स्थापन झालेले पातियाळा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत पातियाळा संस्थानाचे केंद्र होते. येथील किला मुबारक हा शीख वास्तूशास्त्राचा सर्वोत्तम नमुना मानला जातो.

पातियाळा
ਪਟਿਆਲਾ
भारतामधील शहर

पातियाळामधील थापर विद्यापीठ
पातियाळा is located in पंजाब
पातियाळा
पातियाळा
पातियाळाचे पंजाबमधील स्थान

गुणक: 30°20′24″N 76°22′48″E / 30.34000°N 76.38000°E / 30.34000; 76.38000

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा पातियाळा जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १७५४
समुद्रसपाटीपासुन उंची १,१५० फूट (३५० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,४६,२४६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ