रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम

डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (सिंहला: රංගිරි දඹුලු ජාත්‍යන්තර ක්‍රීඩාංගනය, तमिळ: தம்புள்ள இன்டர்நேஷனல் கிரிக்கெட் ஸ்டேடியம்) हे श्रीलंकेतील ३०,०००[] आसने असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान रणगीरी डंबुला मंदिराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या डंबुला जवळच्या मध्य प्रांत येथे ६० एकर (२४०,००० मी²) इतक्या जागेवर वसलेले आहे. सदर मैदान डंबुला जलाशय आणि डंबुला खडक यांच्याजवळ बांधण्यात आले आहे.

रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान
३० ऑगस्ट २०१४ रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय सामन्याच्या वेळी
मैदान माहिती
स्थान डंबुला, मध्य प्रांत
गुणक 7°51′34″N 80°38′02″E / 7.85944°N 80.63389°E / 7.85944; 80.63389
स्थापना २०००
आसनक्षमता १६,८०० (अंदाजे)
मालक सुवर्ण मंदिर, डंबुला
प्रचालक श्रीलंका क्रिकेट
यजमान श्रीलंका क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. २३ मार्च २००१:
श्रीलंका वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. ११ जुलै २०१५:
श्रीलंका वि. पाकिस्तान
प्रथम २०-२० १९ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग वि. नेपाळ
अंतिम २०-२० २२ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग वि. नेपाळ
शेवटचा बदल २५ मे २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

संपादन