ययाति (कादंबरी)

वि. स. खांडेकर लिखित कादंबरी
(ययाती, कादंबरी या पानावरून पुनर्निर्देशित)

ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी इ.स. १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. १९७४ साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[][]

ययाति
लेखक वि. स. खांडेकर
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार


कथानक

संपादन

या कादंबरीची सुरुवात देव दानव युद्धापासून होते. नहुषाच्या मदतीने देवगण युद्ध जिंकतात पण इंद्राला इंद्रपद मुकावे लागते. इंद्रपदाने गर्वित नहुष ताळतंत्र सोडुन वागायला लागतो. इंद्रपदासोबत इंद्राणीचा ह्व्यास त्याला सप्तर्षीच्या पालखीत प्रवास करायला लावतो. उतावीळ झालेला नहुष वृद्ध अगस्त्य ऋषीचा अपमान करतो. अपमानीत गौतम ऋषी त्याला शाप देतात - "ह्या नहुषाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" आणि त्याचे स्वर्गपतन होते. नहुषाचे दोन पुत्र, यति आणि ययाति. यति लहानपणी राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो. ह्याला समांतर देव दानवाच्या युद्धात, शुक्राचार्याच्या संजीवनी विद्येच्या ज्ञानाने दानवाचे पारडे भारी पडते. संजीवनी विद्याप्राप्तीसाठी देवांचे कारस्थान सुरू होते. कारस्थानातील मुख्य पात्र बृहस्पतीपुत्र कच, संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी शुक्राचार्याचा शिष्य बनतो. शुक्रचार्याची पुत्री देवयानी त्याच्यावर मोहित होते.

कथानकातील पात्रे

संपादन

ययातीसंबंधी मराठीतील पुस्तके

संपादन
  • संगीत देवयानी पाणिग्रहण (नाटक, लेखक : भि.ग. आठवले)
  • देवयानी (कादंबरी, लेखक ग.त्र्यं. माडखोलकर)
  • मराठी साहित्यातील ययाती (भास्कर व्यं. गिरधारी)
  • माधवी (नेपाळी कादंबरी, लेखक : मदनमणि दीक्षित)
  • संगीत ययाति (नाटक, लेखक : वि.गो. श्रीखंडे)
  • ययाति (हिंदी, लेखक : अनंत पै)
  • ययाति (कादंबरी, वि.स. खांडेकर) : या कादंबरीच्या लेखनासाठी खांडेकरांना भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
  • ययाती (मूळ कन्‍नड लेखक गिरीश कर्नाड, मराठी अनुवाद : उमा कुलकर्णी), शिवाय श्री.रं. भिडे)
  • संगीत ययाती आणि देवयानी (नाटक, लेखक : वि.वा. शिरवाडकर)
  • ययाती देवयानी (लेखक प्रा, चांगदेव कांबळे) : ययाती आणि देवयानीवर मराठीत आलेल्या साहित्य कृती.
  • ययाति पुरु (सामाजिक कादंबरी, मूळ कन्‍नड लेखिका : दमयंती नरेगल, मराठी अनुवाद सुनंदा मराठे)
  • संगीत विद्याहरण (नाटक, लेखक : कृ.प्र. खाडिलकर)
  • वैरिण झाली सखी (नाटक, लेखक : संजीव शेंडे)
  • शर्मिष्ठा (काव्य, कवी : मंगेश पाडगावकर)

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "अकादमी पुरस्कार". साहित्य अकादमी. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "विष्णु सखाराम खांडेकर" (हिंदी भाषेत). २३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.