ययाति हे एक पौराणिक पत्र असून हा प्राचीन भारतातील चक्रवर्ती सम्राट होता. तसेच हा पांडव आणि यदुवंशीयांचा पूर्वज सुद्धा होता. प्रयागजवळील प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती.

राजा ययाति
Emperor Yayati gray.jpg
सम्राट ययाति चे रेखाचित्र
राज्यव्याप्ती भारत वर्ष
राजधानी प्रतिष्ठान
पूर्वाधिकारी नहुष
उत्तराधिकारी पुरु
वडील नहुष
आई अशोक सुंंदरी
पत्नी देवयानी
इतर पत्नी शर्मिष्ठा
संतती यदु, तुर्वसू, अनु, दृह्यु व पूरू (मुले) आणि माधवी (मुलगी)
राजघराणे सोमवंशी

एकेकाळी इंद्रपद भोगलेला राजा नहुष आणि शिव-पार्वती ची मुलगी अशोक सुंंदरी यांच्यापोटी ययाति चा जन्म झाला.[१] त्याचा मोठा भाऊ यती हा संन्यस्त वृत्तीचा असल्यामुळे नहुष नंतर ययाति ला राज्यपद मिळाले. कालांतराने ययातिचे लग्न देवयानी सोबत झाले. देवयानी ही असूर गुरू शुक्राचार्य ची मुलगी होती आणि देवयानी ची दासी राजकुमारी शर्मिष्ठा होती. देवयानी आणि ययाति यांना यदू व तुर्वसू अशी दोन मुले झाली.[१] त्याच सोबत ययाति आणि शर्मिष्ठा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांना अनू, द्रुह्यू व पुरु अशी तीन मुले झाली. देवयानीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने आपल्या पित्याला म्हणजे शुक्राचार्यांना सर्व वृत्तांत सांगितला. शुक्राचार्यांनी रागात येऊन ययातिला पुरुषत्व जाऊन वार्धक्याचा शाप दिला.[१] कामभाव नष्ट न झाल्याने ययातीने आपल्या मुलांना वार्धक्य घेऊन त्यांचे तारुण्य मागितले. चारही मुलांनी नकार दिला, परंतु पुरुने मात्र या गोष्टीला होकार दिला. पुढील एक हजार वर्षे ययातीने तारुण्य, तर पुरुने वृद्धत्व भोगले. शेवटी पश्चात-बुद्धी होऊन ययातीने आपलं वृद्धत्व वापस घेतले आणि तपश्चर्या करून कालांतराने स्वर्गप्राप्ती मिळवली. देवयानी पुत्र यदू व शर्मिष्ठा पुत्र पुरु यांच्यापासून अनुक्रमे यादव व पौरव या विख्यात वंशशाखा निर्माण झाल्या.[१]

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ a b c d "ययाति". २३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.