प्रा. डाॅ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी (१० जुलै, १९४४:औरंगाबाद, महाराष्ट्र - ) हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक आहेत. ते विद्यापीठातून बी.ए.(मराठी)ला दुसरे (१९६४), एम.ए.(संपूर्ण मराठी)ला (१९६६) पहिले आले होते. पीएच.डी.साठी त्यांनी Modern Marathi Literature based on Mahabharata ह्या विषयावर प्रबंध लिहिला होता (१९७९)

शिक्षणादरम्यान गिरिधारींना मिळालेल्या शिष्यवृत्त्या : (१) महाराष्ट्र सरकारची दक्षिणा शिष्यवृत्ती (१९६५), (२) विद्यापीठाची मेरिट स्काॅलरशिप (१९६६). त्यांना वा.ल. कुलकर्णी, म.गो. देशमुख, यू.म.पठाण, एम.जी. पाटील, गो.के. भट, सुधीर रसाळ यांसारख्या प्राध्यापकांकडून शिकायला मिळाले.

पीएच.डी. झाल्यावर भास्कर गिरिधारी शिक्षक झाले. ते नाशिक, जव्हार येथे, आणि अन्य ठिकाणी ४० वर्षे मराठीचे प्राध्यापक, मराठी विभागप्रमुख किंवा प्राचार्य होते. काॅलेज विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अध्यापनासाठी त्यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांची आणि महाराष्ट्राबाहेरच्या काही विद्यापीठांची मान्यता आहे, त्यांच्या हाताखाली २२हून अधिक विद्यार्थी पीएच.डी. आणि ११हून अधिक एम.फिल. झाले.

पुस्तके

संपादन
  • अभिव्यक्ती
  • आरसा : आदिवासी जीवन शैलीचा!
  • आलेख (समीक्षा लेखसंग्रह)
  • करमणूक (मराठी भाषेतील ह.ना. आपटे संपादक असलेल्या 'करमणूक' साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखनाचा परामर्श)
  • कर्ण आणि मराठी प्रतिभा (समीक्षात्मक ग्रंथ)
  • चळवळ्या माणू (संपादित)
  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले : जीवन-परिचय (संपादित)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : जनजागरण कार्य
  • पंडिती साहित्य
  • मध्ययुगीन वाङ्‌मयप्रवाह : निवडक वेचे (संपादित)
  • मराठी लेखन-शुद्धी
  • मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग
  • मराठी साहित्यातील ययाती
  • महाभारतातील श्रीदुर्गास्तोत्र (संपादित)
  • रूपरेषा आणि निष्कर्ष (प्रबंध)
  • वनवासी-कोकणा शब्दकोश (संपादित)
  • विश्व वनवासींचे
  • अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना

यांच्यावील पुस्तके/प्रबंध

संपादन
  • डॉ. भास्कर गिरिधारी यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास (प्रबंध, सौ. भोसले-गराड)
  • 'आरसा : आदिवासी जीवन शैलीचा' हा विषय घेऊन एका विद्यार्थ्याने एम.फिल. मिळवली आहे.

पुरस्कार

संपादन
  • 'मराठी साहित्यातील ययाती' या ग्रंथाला (१) इचलकरंजी प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि (२) पुण्याचा मराठी ग्रंथोत्तेजक पुरस्कार
  • गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार (१९९७)
  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कार
  • नाशिक नागरिक समितीचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार
  • 'आरसा : आदिवासी जीवन शैलीचा!' या ग्रंथाला युगांतर प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • आदिवासी कल्याण कार्यासाठी शिव-पार्वती पुरस्कार