कच
भारतीय पुराणकथांमधील एका कथेप्रमाणे कच हा देवांचे गुरू बृहस्पतीचा पुत्र होय.
दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी संजीवनीविद्येच्या बळावर दैत्यराजा वृषपर्वा यास देवांचा युद्धामध्ये वारंवार पराभव करण्यास साहाय्य केले. देवांचा राजा इंद्र याने कचास शुक्राचार्यांचा शिष्य होऊन त्यांच्याकडून संजीवनीविद्या शिकून घेण्याच्या कामगिरीवर पाठवले. एका अलौकिक घटनाक्रमामुळे आणि आपली कन्या देवयानी हिच्या आग्रहामुळे शुक्राचार्यांना कचास संजीवनीविद्या शिकवणे भाग पडले अशी पुराणकथा आहे.