वृषपर्वा
वृषपर्वा हा भारतीय पुराणकथांमधील दैत्यांचा एक राजा होता.
त्याने दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या संजीवनीविद्येच्या साहाय्याने देवांचा पराभव केला अशी पुराणकथा आहे. या कथेनुसार वृषपर्व्यास शर्मिष्ठा नावाची कन्या होती. शर्मिष्ठेचा पुढे ययाती नावाच्या राजाशी विवाह झाला. त्यांचा पुत्र पुरू हा पुढे राजा झाला व त्याच्यापासून पौरव राजवंश सुरू झाला.