मोहम्मद झहीर शाह

१९३३ पासून ते १९७३ पर्यंतचा अफगाणिस्तानचा राजा

मोहम्मद झहीर शाह (पश्तो:محمد ظاهرشاه ;उर्दू:محمد ظاهر شاه; १५ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - २३ जुलै, २००७) हा अफगाणिस्तानचा शेवटचा राजा होता. हा १९३३ ते १९७३पर्यंत सत्तेवर होता. त्याला अफगाणिस्ताना राष्ट्रपिता असा खिताब देण्यात आला होता.[१]

१९३० च्या दशकातील सैनिकी पोशाखात झहीर शाह

कौटुंबिक माहिती आणि बालपण संपादन

झहीर शाह मोहम्मद नादिर शाहचा मुलगा होता. नादिर शाह तत्कालीन राजा अमानुल्ला खानच्या सैन्याचा मुख्य सेनापती होता. १० ऑक्टोबर, इ.स. १९२९ रोजी नादिर शाह स्वतः अफगाणिस्तानचा राजा झाला.[२] व झहीर शाहला युवराजपद दिले गेले.

राज्यकाल संपादन

नादिरशाहची हत्या झाल्यावर झहीर शाह ८ नोव्हेंबर, इ.स. १९३३ रोजी राजा झाला. त्याच्या राज्यकालाची पहिली तीस वर्षे त्याचे दोन काका मोहम्मद हाशिम खान आणि शाह महमूद खान यांनीच सत्ता चालवली.[३] या काळात अफगाणिस्तानने इतर देशांशी संबंध प्रस्थापित केले. १९३४ साली अफगाणिस्तान लीग ऑफ नेशन्सचा सदस्य झाला.[४] त्यानंतर काही वर्षांत जर्मनी, इटली, जपानसह अनेक देशांशी व्यापारसंबंधही स्थापले गेले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, "Mohammad Zahir Shah"
  2. ^ Encyclopædia Britannica, "Afghanistan Mohammad Nader Shah (1929–33)"
  3. ^ चेस्टरमन, सायमन; Michael Ignatieff; Ramesh Chandra Thakur. Making States Work: State Failure And The Crisis Of Governance. p. 400.
  4. ^ Jentleson, Bruce W.; Paterson, Thomas G. (1997). The American Journal of International Law: 24. Missing or empty |title= (सहाय्य)