एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका

एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्लिश : Encyclopædia Britannica लॅटिन "ब्रिटिश ज्ञानकोश") हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ. कंपनीतर्फे प्रकाशित केला जाणारा इंग्लिश भाषेतील सामान्य ज्ञानाचा प्रसिद्ध ज्ञानकोश आहे. सुमारे १०० पूर्णवेळ संपादकांमार्फत आणि ४,४००हून अधिक योगदात्यांमार्फत हा ज्ञानकोश लिहिला आणि सतत अद्ययावत केला जातो. इंग्रजी ज्ञानकोशांपैकी सर्वाधिक विद्वत्तापूर्ण अशी त्याची ख्याती आहे.[१]

एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका
लेखक As of 2008, 4,411 named contributors
भाषा English
देश United Kingdom (1768–1900)
United States (1901–present)
प्रकाशन संस्था Encyclopædia Britannica, Inc.

अजूनही प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी ज्ञानकोशांपैकी "ब्रिटानिका" सर्वांत जुना आहे. इ.स. १७६८ ते १७७१ या काळात स्कॉटलंडमधील एडिंबर्ग इथे तीन खंडांमध्ये सर्वप्रथम तो प्रकाशित झाला. दुसऱ्या आवृत्तीत खंडांची संख्या १० झाली; चौथ्या आवृत्तीपर्यंत (१८०१-१८०९) तो २० खंडांचा झाला होता. वाढत्या ख्यातीसोबत या ज्ञानकोशाला प्रसिद्ध विद्वानांचे योगदान मिळविता आले. नववी आवृत्ती (१८७५-१८८९) आणि अकरावी आवृत्ती (१९११) हे ज्ञानकोश विद्वत्ता आणि साहित्यिक शैलीबाबत मैलाचे दगड मानले जातात.१९३३ मध्ये "ब्रिटानिका"ने "सततच्या पुनरावलोकना"चा निर्णय घेतला. मार्च २०१२ मध्ये एन्साय्क्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ.ने जाहीर केले की, यापुढे ते छापील आवृत्त्या प्रसिद्ध न करता ऑनलाईन स्वरूपावर लक्ष केंद्रित करणार आहेत. बत्तीस खंडांमध्ये प्रसिद्ध झालेली २०१०ची आवृत्ती ब्रिटिश ज्ञानकोशाची अखेरची छापील आवृत्ती ठरली.[२]

एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या इ.स. १८९९ सालातील आवृत्तीचे पहिले पान

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Encyclopedia Britannica goes digital after 244 years. The News (2012-03-15). Retrieved 17 March 2012.
  2. ^ Bosman, Julie (13 March 2012). "After 244 Years, Encyclopædia Britannica Stops the Presses". The New York Times. 13 March 2012 रोजी पाहिले. More than one of |author= and |last= specified (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन