मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान (पुस्तक)

(मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान या पानावरून पुनर्निर्देशित)

"प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान" हा डॉ. सुनीती देव यांनी संपादित केलेला ग्रंथ आहे. []. हा ग्रंथ रेगे यांचा विचारविश्वाची माहिती देणारा आहे. प्रा. दि. य. देशपांडे यांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. संपादिका डॉ. देव यांनी हा ग्रंथ दि. य. देशपांडे यांना अर्पण केला आहे.

प्रयोजन

संपादन

रेगे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक लिखाणाचे टीकात्मक परीक्षण करणाऱ्या लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा, या कल्पनेतून हा ग्रंथ निर्माण झाला.[]. संपादक डॉ. देव यांनी ही कल्पना नागपूरच्या तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ प्राध्यापकांसमोर मांडली. रेगे यांचा नागपूर-अमरावती येथील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक यांचा अध्ययन-अध्यापनाच्या निमित्ताने दीर्घकालीन स्नेहबंध होता. रेगे १९८० पासून या प्राध्यापकांना दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आकारिक तर्कशास्त्र शिकवीत त्या करिता ते कसलेही मानधन घेत नसतच पण प्रवासखर्चही मागत नसत. रेगे यांच्या या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त दाखविण्याचा उपाय म्हणून रेगे यांचा सत्काराग्रंथ काढावा, ही (डॉ. देव यांनी मांडलेली) कल्पना उचलून धरण्यात आली.[]. या ग्रंथात नागपूरकर मंडळीचा अधिकच सहभाग आहे.

पुस्तकाचा तपशील

संपादन
  • प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०
  • आवृत्ती : पहिली २०००
  • अक्षरजुळणी : जुळणी विभाग, आजचा सुधारक, मोहोनी भवन, धरमपेठ, नागपूर ४४० ०१०
  • मुद्रण : नितीन तापस, श्याम ब्रदर्स, रामबाग रोड, गणेशपेठ नागपूर ४४० ०१०
  • वितरण : राजहंस प्रकाशन, १०२५ सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०
  • मूल्य : २२५/- रु.
  • पाने : २५३.

अमेरिकेत Library of Living Philosophers[] या नावाची एक ग्रंथमाला प्रकाशित होत आहे. तिच्यातील एकेका ग्रंथाचे स्वरूप म्हणे एखाद्या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्यावर युरोप-अमरिकेतील सुमारे वीस विद्वानांनी समीक्षक निबंध लिहावयाचे आणि शेवटी या सर्वांना त्या तत्त्ववेत्त्याने उत्तरे द्यावयाची. या धर्तीवर सदर ग्रंथाची रचना करण्यात आली आहे.[].

  • संपादकीय
  • प्रास्ताविक
  • रेगे यांचा लेख : तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल
  • रेगे यांच्या विषयीचे लेख
  • रेगे यांनी त्यांच्या विषयीच्या लेखात लेखकांनी घेतलेल्या आक्षेपांना, टीकाकारांना दिलेले उत्तर.
  • रेगे सरांच्या प्रकाशित साहित्याची सूची
  • नवभारत (मासिक) मधील संपादकीयांची सूची
  • मराठी विश्वकोशातील नोंदींची सूची
  • New Quest आणि The Secularist मधील संपादकीयांची सूची आणि लेखांची सूची

रेगे यांच्या विषयीचे लेख

संपादन
  1. डॉ. रा. भा. पाटणकर : तत्त्वज्ञ, प्रबोधनकार व सॉक्रेटीक शिक्षक. समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत स्वतंत्र, मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास.
  2. प्रा. दि.य. देशपांडे : बरट्रंड[] रसेलकृत तत्त्वज्ञानातील समस्याच्या अनुवादातील प्रा. मे.पुं. रेगे यांचे 'प्रास्ताविक भाष्य'
  3. डॉ. शि. स. अंतरकर : हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन
  4. डॉ. ल. ग. चिंचोळकर : इहवाद आणि सर्वधर्मसमभाव
  5. प्रा. प्र. ब. कुलकर्णी : रेगे, हिंदुत्व आणि हिंदुधर्म
  6. डॉ. बा. य. देशपांडे : प्रा. रेगे यांचे सामाजिक चिंतन : भारतीय मुसलमान आणि मंडल आयोग यांच्या संदर्भात
  7. डॉ. सुनीती देव : विवेकवाद आणि त्या समोरील आव्हाने
  8. डॉ. सौ. उषा गडकरी : हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन - एक चिकित्सा
  9. डॉ. विवेक गोखले : प्रा.मे.पुं. रेगे आणि सौंदर्यशास्त्र
  10. डॉ. सुनीती देव : प्रा. रेगे आणि ईश्वर
  11. प्रा.मे.पुं. रेगे : माझ्या टीकाकारांना उत्तर.

रेगे सरांच्या प्रकाशित साहित्याची सूची

संपादन

या विभागाची रचना (संपादकांनी दिली आहे तशी)

संपादन
  1. लेखांची सूची : संख्या ९४
  2. नवभारत (मासिक) मधील संपादकीयांची सूची : संख्या १४६
  3. टोपणनावाने लिहिलेल्या लेखांची सूची : संख्या ०८
  4. अनुवादित साहित्याची सूची : संख्या २२
  5. प्रकाशित पुस्तकांची सूची : संख्या ०५
  6. पुस्तक परीक्षण : संख्या ०९
  7. पुस्तक परिचय : संख्या ०९
  8. प्रा. मे. पुं रेगे यांनी घेतलेल्या मुलाखती : संख्या ०४
  9. अध्यक्षीय भाषणे : संख्या ०४
  10. प्रस्तावना : संख्या ०४
  11. मराठी विश्वकोशातील नोंदी : संख्या ८८
  12. New Quest मधील काही संपादकीयांची आणि लेखांची सूची : संख्या ४१
  13. Journal of the Indian Philosophical Association : संख्या ०४
  14. The Secularist : संख्या ०5

बाह्यदुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ डॉ. सुनीती देव, "प्रा. मे. पु. रेगे यांचे तत्त्वज्ञान", प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००.
  2. ^ संपादकीय, डॉ. सुनीती देव, "प्रा. मे. पु. रेगे यांचे तत्त्वज्ञान", प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००. संपादकीय दिनांक : २२ मार्च २००३
  3. ^ दि. य. देशपांडे, या ग्रंथाविषयी (प्रस्तावना), डॉ. सुनीती देव, "प्रा. मे. पु. रेगे यांचे तत्त्वज्ञान", प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००. संपादकीय दिनांक : २२ मार्च २००३
  4. ^ रेगे यांनी या पुस्तकातील त्यांच्या तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल या लेखात Library of Living Philosophers चे भाषांतर "हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय" असे केले आहे. पान ०१.
  5. ^ दि. य. देशपांडे, या ग्रंथाविषयी (प्रस्तावना), डॉ. सुनीती देव, "प्रा. मे. पु. रेगे यांचे तत्त्वज्ञान", प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००. संपादकीय दिनांक : २२ मार्च २००३
  6. ^ रसेलच्या पहिल्या नावाचा'बरट्रंड' हा दि.य. देशपांडे यांनी केलेला उच्चार आहे.