नवभारत (मासिक) हे प्राज्ञ पाठशाळा, वाई, जिल्हा सातारा येथून प्रकाशित होते. ते ऑक्टोबर १९४७ साली सुरू झाले. (कै.) शंकरराव देव यांनी ते सुरू केले. ते पहिले संपादक होते. त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. मेघश्याम पुंडलिक रेगे, प्रा. श्री. मा. भावे हे संपादकपदी होते. श्री.म. तथा राजा दीक्षित हे विद्यमान संपादक आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान या मासिकास दिले जाते.

नवभारतची भूमिका संपादन

"नवभारतची भूमिका" ही नवभारत, ऑक्टोबर १९४७, वर्ष १ ले, अंक १ मधील कै. शंकरराव देव यांच्या 'संचालकाचे मनोगत' मधून घेतलेली आहे. ती 'नवभारत'च्या प्रत्येक अंकात प्रसिद्ध केलेली असते.

मानवाच्या व मानव संस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक होईल अशा प्रकारे महाराष्ट्रीय जीवनाचा व संस्कृती विकास करणे, हे या मासिकाचे ध्येय व उद्दिष्ट आहे.

ध्येयप्रवण व्यक्तींनी स्वान्नोतीच्या हेतुपुर्तीसाठी जे आपले सांस्कृतिक मूल्यमापन ठरविलेले असेल, उच्च वातावरणातील जो अनुभव स्वतःच्या साधनेने संगृहीत केलेला असेल, त्याचे दिग्दर्शन हेच संस्कृतिपोषक वाङमय होऊ शकते, असा संचालक व संपादक-मंडळ यांचा विश्वास आहे.

या मासिकात येणाऱ्या लेखांत कोणत्याही विशिष्ट मताचा, वादाचा, पक्षाचा किंवा पंथाचा प्रचार करण्याचा हेतू नाही.

संचालक व संपादक-मंडळातील सर्व व्यक्ती यांचे सर्व विषयांत मतैक्य आहे, असे नाही. मानवी जीवनविषयक व सांस्कृतिक मूल्यांसंबंधी सदृश्य अशा दृष्टिकोणानेच त्यांना एकत्र आणले आहे. तथापि प्रत्येकाचे व्यक्तिवैशिष्ट्य व विचारस्वातंत्र्य यांचा विनाश न होता विकास व्हावा, या दृष्टीनेच त्यांचे सहकार्य राहील, प्रत्येक व्यक्ती आपल्या नावानेच प्रसिद्ध होणाऱ्या लेखाबद्दलच जबाबदार राहील.

मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक लिखाणात सत्यनिष्ठा, संयम आणि सहिष्णुता असतील, अशी काळजी घेतली जाईल.

विशेषांक संपादन

संपर्क संपादन

द्वारा प्राज्ञ पाठशाळा मंडळ, ३१५, गंगापुरी , वाई४१२ ८०३ जिल्हा सातारा फोन - ०२१६७+२२००६

संदर्भ संपादन