हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय

हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय ही जगातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे जीवन स्पष्ट करणारी ग्रंथमाला असून विसाव्या शतकातील तत्त्वज्ञानातील ते महत्त्वाचे योगदान मानले जाते. त्यामुळे तत्त्वज्ञान निर्मितीत मोठी भर पडली आहे. पॉल ऑर्थर श्लीप या तत्त्ववेत्त्याने ही ग्रंथमाला १९३९ मध्ये सुरु केली; ते या मालेचे १९८१ पर्यंत संपादक होते. त्यानंतर लेविस एडविन हान हे १९१८ ते २००१ पर्यंत संपादक होते आणि रंडल ऑक्सिएर हे विद्यमान संपादक आहेत. मराठीत या धर्तीवर मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान हे पुस्तक रचल्याचे या पुस्तकाचे प्रस्तावना लेखक प्रा. दि.य. देशपांडे यांनी म्हंटले आहे.[१]

डॉ. राधाकृष्णन यांच्यावर ग्रंथसंपादन करा

या लेखमालेत भारतीय तत्त्ववेत्त्यांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर १९५२ मध्ये ग्रंथ प्रकाशित झाला.[२]

संदर्भसंपादन करा

  1. ^ दि. य. देशपांडे, या ग्रंथाविषयी (प्रस्तावना), डॉ. सुनीती देव, "प्रा. मे. पु. रेगे यांचे तत्त्वज्ञान", प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००. संपादकीय दिनांक : २२ मार्च २००३
  2. ^ "The Philosophy of Sarvepalli Radhakrishnan | Philosophy | SIU". cola.siu.edu. 2019-03-13 रोजी पाहिले.