मेरी आँत्वानेत
(मेरी ऑंत्वानेत या पानावरून पुनर्निर्देशित)
मेरी ऑंत्वानेत तथा मरिया ॲंतोनिया जोसेफा जोहाना (२ नोव्हेंबर, इ.स. १७५५:हॉफबर्ग महाल, व्हियेना, ऑस्ट्रिया - १६ ऑक्टोबर, इ.स. १७९३:प्लेस दिला रेव्होल्युशन, पॅरिस, फ्रांस) ही फ्रांसची राणी होती.
मेरी फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट आणि त्याची बायको मरिया तेरेसाची मुलगी असून एप्रिल १७७०मध्ये हीचे लग्न फ्रांसच्या युवराज लुई ऑगुस्तेशी झाल्यावर ती फ्रांसची युवराज्ञी झाली. ही मूळची ऑस्ट्रियाची होती. तिच्या नणंदा तिचा उल्लेख ऑस्ट्रियन बाई (ल'ऑश्ट्रिशियेन) असा करीत. लुई ऑगुस्ते लुई सोळावा म्हणून राजा झाल्यावर मेरी १० मे, इ.स. १७७४ रोजी फ्रांसची राणी झाली. तिला दोन मुले व दोन मुली अशी एकूण चार अपत्ये झाली.
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तिच्यावर तुरुंगवासात दोन दिवसांचा खटला चालविला जाऊन तिसऱ्या दिवशी तिला मृत्युदंड देण्यात आला.