मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे.[] याला उडीद वडा असेही म्हणले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.[] दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो.

मेदूवडा सांबार आणि चटणी

साहित्य आणि कृती

संपादन

साहित्य -

  1. उडीद डाळ
  2. हिरव्या मिरच्या
  3. मीठ
  4. काळी मिरी
  5. कडीपत्ता
  6. तळण्यासाठी तेल
  7. नारळाचे काप []

कृती -

  • उडीद डाळ प्रथम स्वच्छ धुऊन घ्यावी. ४ ते ५ तास उडीद डाळ पाण्यात भिजत घालावी. डाळ भिजल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाकावे आणि केवळ डाळ मिक्सरमधून वाटून घ्यावी.
  • वाटलेल्या डाळीत मीठ, कुटलेली मिरी, हिरव्या मिरचीचे तुकडे,आणि असल्यास नारळाचे काप घालावेत.
  • कढईत तेल गरम करायला;आहे ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात वडे सोडावेत. तळहातावर पिठाचा गोल करून त्याला मध्यभागी भोक पाडावे किंवा झाऱ्यावर असा वडा तयार करून घेऊन तो कढईत गरम तेलात सोडावा.
  • सोनेरी रंग आल्यावर वडा आतून पूर्ण तळला गेला आहे याची खात्री झाल्यावर वडा तेलातून बाहेर काढावा आणि तेल पूर्ण निथळून घ्यावे.
  • नारळाची चटणी आणि सांबार याबरोबर खाण्यासाठी द्यावे. []

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Medu Vada Recipe: घर पर बनाएं टेस्टी और क्रिस्पी साउथ इंडियन डिश मेदू वड़ा". www.timesnowhindi.com (हिंदी भाषेत). 2020-08-30. 2020-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ Hingle, Richa. Vegan Richa's Indian Kitchen: Traditional and Creative Recipes for the Home Cook (अंग्रेजी भाषेत). Andrews McMeel Publishing. ISBN 9781941252109. 21 December 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Medu Vada: What Makes it Such a Popular Breakfast Treat". NDTV Food. 2020-09-13 रोजी पाहिले.
  4. ^ "How to make medu vada or medhu vadai". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2019-04-30. 2020-09-13 रोजी पाहिले.