कढीलिंब

(कडीपत्ता या पानावरून पुनर्निर्देशित)

गोडलिंब/कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थ बनवताना करतात.

कढीलिंबाचे झाड
कढीलिंबाची पाने
गोडलिंब/कढीपत्त्याचे झाड
कढीलिंबाची पाने आणि फुले

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या पानांमध्ये antioxidant (ॲंटिऑक्सिडन्ट), ॲंटि-डायबेटिक (anti-diabetic), ॲंटिमायक्रोबियल (antimicrobial), ॲंन्टि-इन्फ्लेमेटरी (सूजप्रतिबंधक) गुण असतो .

कढ़ीलंबाचे झाड (मुराया कोएनिजी, (Murraya koenigii); अन्य नावे : बर्गेरा कोएनिजी, (Bergera koenigii), चल्कास कोएनिजी (Chalcas koenigii), वगैरे. हे झाड छोटे असते. याची उंची दोन ते चार मीटर असते आणि त्याच्या खोडाचा व्यास ४० सें.मी. पर्यंत असू शकतो. झाडाची पाने टोकदार असतात. प्रत्येक फांदीवर ११ ते २१ पर्णिका असतात. प्रत्येक पर्णिका दोन ते चार सें.मी. लांब व एक-दोन सें.मी. रुंद असते.

उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांत मिळणारे हे रुतासी (Rutaceae) परिवाराचे झाड आहे. हे झाड मुळचे भारतीय आहे. या झाडाची ओली पाने रस्सेदार किंवा शिजवलेल्या सुक्या खाद्यपदार्थांत स्वादासाठी वापरतात..

कढीलिंबाच्या पानांना हिंदीत "कढ़ी पत्ता" म्हणतात. काही लोक याला "मीठी नीम की पत्तियां" पण म्हणतात.

याच्या तमिळ नावाचा अर्थ आहे - जिचा उपयोग रस्सेदार खाद्यपदार्थात होतो अशी पाने.

कन्नड़ भाषेमध्ये कधीलिंबाच्या पानाला 'काला नीम' या अर्थाचा शब्द आहे. कारण याची पाने कडूनिंबाच्या पानांसारखी दिसतात. परंतु या कढ़ीपत्त्याच्या झाडाचा लिंबाच्या झाडाशी काही संबंध नाही.

कढ़ीपत्ता हे पान तेज पत्ता किंवा तुळशीच्या पान यांच्यापेक्षा किंवा भूमध्यसागर प्रदेशांमध्ये मिळणाऱ्या सुगंधित पानांपेक्षा खूप वेगळे आहे.

या प्रजातीला वनस्पतिशास्त्रज्ञ जोहान कॉनिग याचे नाव दिले आहे.

कढीलिंबाची फुले लहान, सफ़ेद रंगांची आणि सुगंधित असतात. त्याची लहान चमकदार, हिरवी-काळी फळे खाण्यासारखी असतात पण त्यांतले बी विषारी असते (?).

अन्य उपयोग

संपादन

कढीलिंबाच्या पानांची वाटून चटणी करतात.

याच्या पानांचा उपयोग तमालपत्राप्रमाणे साधारणत: पाककृतीत सुरुवातीलाच फोडणीबरोबरच शिजवून केला जातो. कढीलिंबाचे ताजे पान फ्रिजमध्येपण ताजे राहत नाही आणि बाहेरही बरेच दिवस नाही रहात नाही.. तसे हे पान वाळले तरी वापरता येते. पण त्यात सुगंध कमी असतो.

मुराया कोएनिजी (Murraya koenigii)च्या पानांचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये जड़ी-बूटीच्या रूपात औषधी वापर केला जातो.

More information: मीठा नीम, वैज्ञानिक वर्गीकरण …