ढग

(मेघ (ढग) या पानावरून पुनर्निर्देशित)
nube (es); ský (is); ၽႃႈ (shn); awan (ms); cloud (en-gb); ورېځ (ps); بدݪ (pnb); بادل (ur); oblak (sk); хмара (uk); коволхне (mdf); Wolke (gsw); bulut (uz); ডাৱৰ (as); облак (mk); oblak (bs); बादर (bho); nuvi (ext); nuage (fr); oblaci (hr); пельть (myv); ढग (mr); ମେଘ (or); debesis (sgs); बादर (awa); Amafu (zu); Wollek (lb); sky (nb); bulud (az); baadal (hif); bulut (crh); 雲 (lzh); سحاب (ar); koumoul (br); တိမ် (my); 雲 (yue); булут (ky); balve (sma); nube (ast); núvol (ca); болот (ba); cwmwl (cy); nivola (lmo); scamall (ga); ամպ (hy); 云 (zh); sangbani (dag); ღრუბელი (ka); Wolk (pdc); nube (ia); gajimare (ha); qinaya (ay); ladem (szy); बादल (hi); 云 (wuu); pilvi (fi); nûlêye (wa); Wolk (li); முகில் (ta); tawan (dtp); boira (an); νέφος (el); хмара (be-tarask); булут (krc); болытлар (tt-cyrl); yùn (hak); മേഘം (ml); nube (lfn); nùvula (scn); облак (sr); awan (id); panganod (ceb); 구름 (ko); chmura (pl); nûl (fur); سحاب (arz); nioru (rup); lorem (pag); เมฆ (th); 雲 (ja); Awan (ace); oblak (sh); bulut (tr); debesis (lt); nuvia (lij); Wulke (stq); Oduku inyọn̄ (ann); Remang (iba); nùvoła (vec); Wolk (fy); སྤྲིན། (bo); ƿolcen (ang); leru (nso); nivulu (co); mixtli (nah); nuvem (pt); хмара (rue); ھەور (ckb); re (sq); panganuron (bcl); awan (su); osko (atj); ابر (fa); komolen (kw); облак (bg); neuèe (pcd); nor (ro); nura (nap); ᥛᥩᥐᥱ ᥐᥧᥛᥲ (tdd); caad (so); moln (sv); vo'e (chy); pilv (et); nóvvla (eml); абр (tg); dilnu (jbo); მუნაფა (xmf); بۇلۇت (ug); oblak (cs); nubo (eo); nívol (oc); nubia (pap); bodjal (gv); মেঘ (bn); пилем (udm); méga (jv); बादल (anp); hùng (cdo); niyaj (gcr); amdlu (shi); װאָלקן (yi); rahona (mg); mróčel (hsb); mây (vi); pil'v (vep); mākoņi (lv); wolk (af); уүлэн (bxr); Woikn (bar); mɩndʋ (kbp); nuvem (pt-br); clood (sco); уүл (mn); sky (nn); ܥܢܢܐ (arc); మేఘం (te); awan (min); pilv (vro); накӀкӀ (av); lipata (ln); cloud (en); Ամպ (hyw); arai (gn); dampog (war); Wolke (de); ᓄᕗᔭᖅ (iu); felhő (hu); ደመና (am); ענן (he); hodei (eu); воблака (be); облак (sr-ec); 𐌼𐌹𐌻𐌷𐌼𐌰 (got); phuyu (qu); बादल (mai); мархаш (ce); ulap (pam); ਬੱਦਲ (pa); ulep (ilo); lawuo (nia); बादल (ne); булут (tyv); ewr (ku); nouage (nrm); hûn (nan); nube (ie); ɔ̀nd (bas); болытлар (tt); облако (ru); Wulk (nds); ᱨᱤᱢᱤᱞ (sat); awan (bew); swarken (frr); ꯂꯩꯆꯤꯜ (mni); વાદળ (gu); fwj (za); nuvola (it); بولود (azb); ಮೋಡ (kn); nwaj (ht); Ombun (bbc); kloud (jam); 雲 (zh-hant); amafu (xh); hewr (diq); बादल (dty); пĕлĕтсем (cv); oblak (sr-el); lefog (vo); اۆبُر (ks); rakun (bjn); सुपाँय् (new); oblak (sl); ulap (tl); бұлттар (kk); ᎤᎶᎩᎸ (chr); mununkum (tw); wingu (sw); neul (gd); wolk (nl); nubo (io); былыт (sah); ڪڪر (sd); O (Meteorology) (fj); nube (gl); sky (da); 云 (zh-hans); nubes (la) hidrometeoro visible formado por la acumulación de cristales de hielo y/o gotas de agua microscópicas suspendidas en la atmósfera (es); взвешенные в атмосфере продукты конденсации водяного пара (ru); sichtbare Ansammlung sehr feiner Wassertröpfchen oder Eiskristalle in der Atmosphäre (de); grumbull avujsh uji, që rrinë pezull lart në qiell (sq); تودهٔ قابل مشاهده از قطره‌های مایع یا بلورهای یخ‌زده معلق در جو (fa); 大气层中的液滴或冰晶集合体 (zh); sau soroma ba mbanua yaŵa na lö ohahau sibai mbanua (nia); serbest bir hava kütlesinde toplanmış, gözle görülebilir su damlacıkları, buz kristalleri veya her ikisinin karışımından oluşan yapı (tr); 大気中にかたまって浮かぶ水滴または氷の粒 (ja); viditeľná sústava malých častíc vody alebo ľadu v atmosfére Zeme alebo iných kozmických telies (sk); תופעה מטאורולוגית של אדים בשמיים (he); 지구, 행성 또는 위성의 대기에 떠다니는, 작은 물방울이나 얼음 알갱이들의 모임 (ko); masse d' aiwe ki s' a svinté, rashonnêye dins l' cir, ki pout toumer come plouve, nive u gurzeas (wa); amaso de akvaj gutetoj ŝvebanta meze de atmosfero (eo); nepravidelný útvar v atmosféře tvořený drobnými kapičkami vody nebo krystalky ledu (cs); idrometeora costituita da minute particelle d'acqua condensata (it); দৃশ্যমান জলকণা বা হিমায়িত বরফের স্ফটিক যা পৃথিবীর পৃষ্ঠের উপরে বায়ুমণ্ডলে ভাসমান অবস্থায় থাকে (bn); phénomène atmosphérique (fr); fenomèn atmosferik (ht); водныя кропелькі, распушчаныя ў атмасфэры (be-tarask); visible mass of liquid droplets or frozen crystals suspended in the atmosphere (en); widźomne mnóstwo małkich wodowych kapkow abo lodowych kristalow w atmosferje (hsb); dạng aerosol gồm các giọt chất lỏng nhỏ lơ lửng trong bầu khí quyển (vi); sigbare massa vloeistofdruppels of bevrore kristalle wat in die atmosfeer hang (af); visible mass of liquid droplets or frozen crystals suspended in the atmosphere (en); Indindibala ebonakalayo yamaconsi oketshezi noma imincwebe ekhazileyo ejitshwe esibhakabhakeni (zu); massa visível de líquidos na atmosfera (pt); massa visível de líquidos na atmosfera (pt-br); видима маса крапель рідини або заморожених кристалів, завислих в атмосфері (uk); massa tetesan cairan yang tampak atau kristal beku yang tertahan di atmosfer (id); skupisko zawieszonych w atmosferze kropli cieczy lub kryształków fazy stałej (pl); ilmakehässä yhteen kasaantuneet jääkiteet ja vesipisarat (fi); makitkita a a masa dagiti tedted ti likido wenno nayelo a kristal a naibitin iti atmospera (ilo); sɛ osuo muna na sɛ ɛpɛ sɛ ɛtɔ a (tw); massa visible de cristalls de gel i/o gotes d'aigua microscòpiques (ca); видима сукупность малых частіць воды або леду (rue); lendav vesi, atmosfäärinähtus (et); conxunto visible de partículas de auga en suspensión na atmosfera (gl); كتل مرئية من قطرات سائلة أو بلورات متجمدة معلقة في الغلاف الجوي (ar); 大气层中的液滴或冰晶集合体 (zh-hans); ansamling af fine vanddråber eller iskrystaller i atmosfæren (da) nubes (es); облака (ru); Wolken (de); хмара, Воблакі (be); ամպեր (hy); 雲, 云朵, 云层, 雲朵, 雲層 (zh); sky (meteorologi) (da); بدل (pnb); хмари (uk); nouwaedje (wa); mrak (cs); உயர்மட்ட மேகங்கள் (ta); बदरी, बादल (bho); пилемъёс (udm); воблака (be-tarask); וואלקן (yi); mróčele, mróčelka (hsb); Méga (su); rakun (météorologi) (bjn); retë, reja (sq); oblaček, oblakec (sl); Pil'ved (vep); pilved (et); ᎤᎶᎩᎳ (chr); ewiem, omununkum (tw); Chmura (meteorologia) (pl); Sky (nb); oblaci (sh); O (fj); пель (myv); Пĕлĕт (cv); ئەور, ھەڤر, ئەڤر (ckb); clouds (en); غيوم الحملان (ar); mega (id); Nube (it)
ढग 
visible mass of liquid droplets or frozen crystals suspended in the atmosphere
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtype of meteorological phenomenon
उपवर्गहवामान
वापरलेली सामग्री
पासून वेगळे आहे
  • Chmura
असे म्हणतात कि यासारखेच आहेNuaj
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
निळ्या आकाशात तरंगणारे ‎ढग
सायंकाळ असतांना ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातून दिसणारे ढग व आकाश
चंद्र ढगाआड असतांना रात्रीच्यावेळी दिसणारे ढग
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातून दिसणारे ढग व आकाश
आकाशातील ढग

ढगांचे घटक

संपादन

पदार्थांच्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा  आणि / किंवा हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समूह म्हणजे ढग.[] ढगात जलकणां-हिमकणांबरोबरच सूक्ष्म धूलिकण किंवा धूम्रकणही असू शकतात.

क्वचित प्रसंगी प्रदूषण, धुळीची  वादळे, ज्वालामुखी, अणुस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच धूलिकणांचाण किंवा धूम्रकणांचा असू शकतो.

जलचक्रात पाण्याची वाफ होते, ती उंच जागी गेल्यावर त्याचे ढग होतात , व त्यास थंडावा मिळाला की पाऊस पडतो. पाऊस पडण्यासाठी ढगांची आवश्यकता असते.[]

ढगांची निर्मिती

संपादन

ढगांची निर्मिती सर्वसाधारणपणे खालील प्रकारे होते.[]

  1. भूपृष्ठावरील आर्द्रतायुक्त हवा अनेक कारणांमुळे वर वर जाऊ लागते. तप्त जमिनीचे सानिध्य, पर्वत किंवा टेकडी सारखी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, अशा अनेक कारणामुळे अशा हवेला  ऊर्ध्वगामी दिशा मिळते.
  2. वर गेल्यावर ही हवा प्रसरण पावते आणि त्यामुळे आणखी हलकी होते. तिच्यावरील दाबही कमी होतो आणि ती अजूनच वर वर जाऊ लागते. अशी ती वर वर जात असताना तिचे आंतरिक प्रसरण होते आणि ती थंड होऊ लागते..
  3. हवा थंड होऊ लागल्यामुळे तिची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते.
  4. विशिष्ट उंचीवर गेल्यावर ती संपृक्त बिंदू गाठते.
  5. वातावरणात अनेक अदृश्य व सूक्ष्म असे धूलिकण व धूम्रकण इतस्ततः संचार करत असतात. असे कण आर्द्रताग्राही असतात. हवा अजून वर जात राहिल्यास हवेचे म्हणजेच त्यातील जलबाष्पाचे तापमान द्रवांकाच्याही खाली जाऊन अशा सूक्ष्म कणांवर जलबाष्पाचे संद्रवण किंवा द्रवीकरण होते आणि पाण्याचे थेंब तयार होतात. असे असंख्य जलबिंदू एकत्र आल्यावर त्यांचा दृश्य स्वरूपातला ढग तयार होतो.

ढगनिर्मितीची काही विशिष्ट कारणे :

कधी कधी वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. अशा क्षेत्रात आर्द्र हवा सर्व बाजूंनी प्रवेश करते आणि वर उचलली जाते. आंतरिक प्रसरणाने ती खूपच थंड होते आणि त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर जाड व मोठ्या ढगांची निर्मिती होते.

टेकडी किंवा डोंगर उतारावर पायथ्याकडील वारे टेकडी किंवा डोंगरामुळे वर उचलले जातात.अशी  खूप आर्द्रतायुक्त हवा वर वर चढत जाते तेव्हा तिचे आंतरिक प्रसरण होते व त्यामुळे ती थंड होते. त्या थंडाव्यामुळे हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. धुक्याचेच ढग होतात.[]

जमिनीवरील आर्द्रतायुक्त उष्ण हवा शीतप्रदेशाकडे किंवा समुद्राकडे वाहू लागते आणि ती थंड भृपृष्ठाच्या किंवा समुद्राच्या सानिध्याने थंड होते. अशा थंडाव्यामुळे त्या हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. असे धुके वाऱ्याच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे वर उचलले जाऊन स्तरीय प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.[]

हिवाळ्यात जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होऊन जमीन अधिक थंड होते. अशा  जमिनीवरची हवाही सानिध्याने थंड होऊन त्या हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके तयार होते. सूर्याच्या उष्णतेने किंवा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे धुके वर उचलले जाऊन स्तरीय प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.[]

ढगांचे वर्गीकरण

संपादन

आकाशात निरीक्षण केले असताना आपणास ढगांचे निरनिराळे आकार, रूप व विस्तार पाहायला मिळतो. ढगांचे वर्गीकरण ह्याच घटकांवर आधारित आहे.

ढगांचे सर्वप्रथम वर्गीकरण जे बी लामार्क ह्या फ्रेंच शास्त्रज्ञाने इस १८०२ मध्ये केले. त्यानंतर इस १८०३ मध्ये ल्यूक हॉवर्ड ह्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण प्रसिद्ध करून खालील नावे जाहीर केली.[]

  1. पिसांसारखे  किंवा कुरळ्या केसांसारखे दिसणारे तंतुमेघ
  2. स्तरीय मेघ
  3. राशिमेघ
  4. पाऊस देणारे वर्षामेघ

तंतुमेघ, स्तरीय मेघ, राशिमेघ व वर्षामेघ हे स्वतंत्ररीत्या किंवा एकमेकांच्या संयोगाने विविध स्वरूपात आढळून येतात. शेवटी जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेने इस १९५७ मध्ये ढगाच्या तळाची उंची,आकार, स्वरूप आणि इतर ढगांशी केलेला संयोग ह्याचा विचार करून ढगांच्या दहा मुख्य प्रजाती जाहीर केल्या.[] आणि त्याच आता जगभर ग्राह्य धरल्या जातात.

पातळी जमिनीपासून मेघतळाची अंदाजे उंची (समशीतोष्ण प्रदेश) जमिनीपासून मेघतळाची अंदाजे उंची (धृवीय प्रदेश) प्रजातीचे नाव
उच्च पातळी ५ ते १४ कि मि ३ ते ८ कि मि तंतुमेघ         Cirrus
५ ते १४ कि मि ३ ते ८ कि मि तंतुराशिमेघ  Cirrocumulus
५ ते १४ कि मि ३ ते ८ कि मि तंतुस्तरमेघ Cirrostratus
मध्य पातळी २ ते ७ कि मि २ ते ४ कि मि मध्यराशिमेघ Altocumulus
२ ते 7 कि मि २ ते ४ कि मि मध्यस्तरीमेघ Altostratus
निम्न पातळी भूपृष्ठ ते २ कि मि भूपृष्ठ ते २ कि मि वर्षास्तरीमेघ Nimbostratus
भूपृष्ठ ते २ कि मि भूपृष्ठ ते २ कि मि स्तरराशीमेघ stratocumulus
भूपृष्ठ ते २ कि मि भूपृष्ठ ते २ कि मि स्तरमेघ Stratus
भूपृष्ठ ते २ कि मि भूपृष्ठ ते २ कि मि राशीमेघ Cumulus
भूपृष्ठ ते २ कि मि भूपृष्ठ ते २ कि मि गर्जन्मेघ Cumulonimbus

याशिवाय इतरही काही ढग काही विशिष्ट स्थळी/विशिष्ट परिस्थितीत तयार होतात. मात्र ते वरील वर्गीकरणात मोडत नाहीत. उदा, ज्वालामुखी निर्मित, अणुस्फोटजन्य, अडथळाजन्य बहिर्गोल भिंगाकार ढग, इत्यादी.

ढगांचे पृथ्वीबाहेरचे अस्तित्त्व

संपादन

ढगांचे अस्तित्त्व पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्रही आढळून येते.

शुक्रावर ढगांचे आवरण आढळले असून तेथे सल्फर डायऑक्साइडचे घनदाट ढग आढळून येतात.[]हे  ढग स्तरीय प्रकारचे मेघ असून ज्वालामुखीय हालचालींमुळे तयार झाले आहेत. हे ढग ४५ ते ६५ किमी उंचीवर तीन मुख्य स्तरांमध्ये आढळतात आणि त्यामुळे शुक्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे जवळ जवळ अशक्य बनते. त्याखाली शुक्रावर कोणतेही राशीमेघ प्रकारचे ढग आढलेलेले नाहीत, परंतु वरील पातळीवर कधीकधी स्तरराशीमेघ प्रकारचे तुटक स्वरूपातील ढग आढळून येतात.

मंगळावर बहिर्गोल भिंगाकार (lenticular), तंतुमेघ, तंतुराशीमेघ  आणि पाण्यापासूनच्या बर्फाने बनलेले स्तरराशीमेघ असे काही प्रकारचे ढग बहुतांशी ध्रुवभागाजवळ आढळले आहेत.[][१०] मंगळावर पाण्याचे बर्फ आणि त्यापासूनचे धुकेदेखील आढळले  आहे.[११]

गुरू आणि शनि या दोन्ही ग्रहांवर उच्च स्तरावर अमोनियापासून बनलेले तंतुमेघ[१२][१३], मध्यस्तरावर अमोनियम हायड्रोसल्फाईडपासून बनलेलले  धुके सदृश्य स्तरीय मेघ, आणि निम्न स्तरावर जलकणांचे राशीमेघ आढळून येतात.[१४] [१५] तसेच गुरूच्या अंतर्भागात लाल ठिपक्याजवळ गर्जन्मेघ अस्तित्त्वात असल्याचे ज्ञात आहे.[१६][१७] अशाच प्रकारचे ढगांचे आच्छादन  युरेनस आणि नेपच्यूनवर देखील आढळते परंतु हे आच्छादन मिथेनचे बनलेले आहे.[१८][१९][२०][२१][२२][२३] शनिचा उपग्रह टायटनवर मिथेनचेच बनलेले तंतुमेघ आढळतात.[२४][२५] कॅसिनी-ह्यूजेन्स शनि मोहिमेत शनीवरील ध्रुवीय स्तरीय ढगांचा[२६] आणि टायटनवरील मिथेन चक्राचा पुरावा सापडला आहे.[२७]

सूर्यमालेबाहेरील काही ग्रहांवरच्या वायुमंडलात ढगांचे अस्तित्त्व असल्याचे मानले जाते. ऑक्टोबर 2013 मध्ये, केप्लर -7 बी ह्या सूर्यमालेबाहेरील ग्रहाच्या  वातावरणात उच्च स्तरावर घनदाट ढगांचे अस्तित्त्व घोषित करण्यात आले आहे.[२८][२९] तसेच डिसेंबर 2013 मध्येही  जीजे 436 बी आणि जीजे 1214 बी ह्या ग्रहांच्या वातावरणात ढगांचे अस्तित्त्व जाहीर झाले आहे.[३०][३१][३२][३३]

ढगांचे महत्त्व

संपादन

पृथ्वीवरच्या वातावरणाचे ढग हे महत्त्वाचे घटक आहेत कारण ते विविध कामे पार पाडतात.

ढग हे पर्जन्यचक्रात मोलाची कामगिरी बजावतात. ढगांमुळे पाऊस पडतो व पृथ्वीवर दूरदूर पर्यंत पाण्याचा पुरवठा होतो.

ढग सूर्यकिरणांचे आणि त्यामुळे येणाऱ्या उष्णतेचे परावर्तन करतात. तसेच पृथ्वी जी उष्णता उत्सर्जित करते ती ढग शोषून घेतात. त्यामुळे उष्णतेचा समतोल राखण्यास मदत होते.

विषुववृत्तीय प्रदेशातील उष्णता पृथ्वीवर इतरत्र उदा.० ध्रुवीय प्रदेशात पसरवण्यासाठी ढगांची मदत होते.

एकूणच हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी त्याचे भाकीत करण्यासाठी ढगांचा उपयोग होतो.

रोचक तत्थ्य

संपादन

एका ढगाचे वजन जवळजवळ पाच लाख किलो म्हणजेच एका विमानाएवढे किंवा १०० हत्तींएवढे असते.

संदर्भ

संपादन
  1. ^ प्रा. वसंत पांडुरंग नेने (२००६). ढगांचे विज्ञान. पुणे: पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन. pp. ८.
  2. ^ "ढगांची व्याप्ती". लोकसत्ता. १६ ऑक्टोबर २०१७. ११ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ प्रा. वसंत पांडुरंग नेने (२००६). ढगांचे विज्ञान. पुणे: पुणे विद्यार्थी गृह prakashan. p. 22.
  4. ^ प्रा. वसंत पांडुरंग नेने (२००६). ढगांचे विज्ञान. पुणे: पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन. pp. २६.
  5. ^ a b प्रा. वसंत पांडुरंग नेने (2006). ढगांचे विज्ञान. पुणे: पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन. pp. २९.
  6. ^ प्रा.वसंत पांडुरंग नेने (2006). ढगांचे विज्ञान. पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन. p. 9.
  7. ^ कोष्टक २. [मराठी विश्वकोश "मेघांचे वर्गीकरण"] Check |दुवा= value (सहाय्य).
  8. ^ Bougher, Stephen Wesley; Phillips, Roger (1997). Venus II: Geology, Geophysics, Atmosphere, and Solar Wind Environment. University of Arizona Press. pp. 127–129. ISBN 978-0-8165-1830-2.
  9. ^ "SPACE.com staff (2006-08-28). "Mars Clouds Higher Than Any On Earth". SPACE.com. Retrieved 2008-10-19".
  10. ^ "Clouds Move Across Mars Horizon". Phoenix Photographs. National Aeronautics and Space Administration. 19 September 2008. Retrieved 15 April 2011. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ "NASA SP-441: Viking Orbiter Views of Mars". National Aeronautics and Space Administration. Retrieved 26 January 2013. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Phillips, Tony (20 May 2010). "Big Mystery: Jupiter Loses a Stripe". Nasa Headline News – 2010. National Aeronautics and Space Administration. Retrieved 15 April 2011. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ Dougherty, Michele; Esposito, Larry (November 2009). Saturn from Cassini-Huygens (1 ed.). Springer. p. 118. ISBN 978-1-4020-9216-9. OCLC 527635272. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  14. ^ Ingersoll, A.P.; Dowling, T.E.; Gierasch, P.J.; Orton, G.S.; Read, P.L.; Sanchez-Lavega, A.; Showman, A.P.; Simon-Miller, A.A.; Vasavada, A.R. "Dynamics of Jupiter's Atmosphere" (PDF). Lunar & Planetary Institute. Retrieved 1 February 2007. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  15. ^ Monterrey Institute for Research in Astronomy (11 August 2006). "Saturn". Retrieved 31 January 2011. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ "Thunderheads on Jupiter". Jet Propulsion Laboratory. National Aeronautics and Space Administration. Retrieved 26 January 2013. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ Minard, Anne (14 October 2008). "Mysterious Cyclones Seen at Both of Saturn's Poles". National Geographic News. National Geographic. Retrieved 26 January 2013. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ Taylor Redd, Nola (2012). "Neptune's Atmosphere: Composition, Climate, & Weather". Space.com. Retrieved 5 November 2013. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  19. ^ Boyle, Rebecca (18 October 2012). "Check Out The Most Richly Detailed Image Ever Taken Of Uranus". Popular Science. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ Irwin, Patrick (July 2003). Giant Planets of Our Solar System: Atmospheres, Composition, and Structure (1 ed.). Springer. p. 115. ISBN 978-3-540-00681-7.
  21. ^ "Uranus". Scholastic. Archived from the original on 2 September 2011. Retrieved 16 April 2011. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ Lunine, Jonathan I. (September 1993). "The Atmospheres of Uranus and Neptune". Annual Review of Astronomy and Astrophysics. 31: 217–263. Bibcode:1993ARA&A..31..217L. doi:10.1146/annurev.aa.31.090193.001245. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ Elkins-Tanton, Linda T. (2006). Uranus, Neptune, Pluto, and the Outer Solar System. New York: Chelsea House. pp. 79–83. ISBN 978-0-8160-5197-7.
  24. ^ Athéna Coustenis; F.W. Taylor (2008). Titan: Exploring an Earthlike World. World Scientific. pp. 154–155. ISBN 978-981-270-501-3.
  25. ^ "Surprise Hidden in Titan's Smog: Cirrus-Like Clouds". Mission News. National Aeronautics and Space Administration. 3 February 2011. Retrieved 16 April 2011. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ Elizabeth Zubritsky (2016). "NASA Scientists find impossible cloud on titan". Retrieved 1 November 2016. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ National Aeronautics and Space Administration, ed. (2008). "NASA Confirms Liquid Lake On Saturn Moon, Cassini Mission News". Retrieved 5 April 2018. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  28. ^ Chu, Jennifer (2 October 2013). "Scientists generate first map of clouds on an exoplanet". MIT. Retrieved 2 January 2014. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ Demory, B. O.; De Wit, J.; Lewis, N.; Fortney, J.; Zsom, A.; Seager, S.; Knutson, H.; Heng, K.; Madhusudhan, N.; Gillon, M.; Barclay, T.; Desert, J. M.; Parmentier, V.; Cowan, N. B. (2013). "Inference of Inhomogeneous Clouds in an Exoplanet Atmosphere". The Astrophysical Journal. 776 (2): L25. arXiv:1309.7894. Bibcode:2013ApJ...776L..25D. doi:10.1088/2041-8205/776/2/L25. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  30. ^ Harrington, J.D.; Weaver, Donna; Villard, Ray (31 December 2013). "Release 13-383 – NASA's Hubble Sees Cloudy Super-Worlds With Chance for More Clouds". NASA. Retrieved 1 January 2014. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  31. ^ Moses, J. (2014). "Extrasolar planets: Cloudy with a chance of dustballs". Nature. 505 (7481): 31–32. Bibcode:2014Natur.505...31M. doi:10.1038/505031a. PMID 24380949. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  32. ^ nutson, H. A.; Benneke, B. R.; Deming, D.; Homeier, D. (2014). "A featureless transmission spectrum for the Neptune-mass exoplanet GJ 436b". Nature. 505 (7481): 66–68. arXiv:1401.3350. Bibcode:2014Natur.505...66K. doi:10.1038/nature12887. PMID 24380953. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  33. ^ Kreidberg, L.; Bean, J. L.; Désert, J. M.; Benneke, B. R.; Deming, D.; Stevenson, K. B.; Seager, S.; Berta-Thompson, Z.; Seifahrt, A.; Homeier, D. (2014). "Clouds in the atmosphere of the super-Earth exoplanet GJ 1214b". Nature. 505 (7481): 69–72. arXiv:1401.0022. Bibcode:2014Natur.505...69K. doi:10.1038/nature12888. PMID 24380954. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)