इंग्रजी नाव - Cirrostratus Cloud

इंग्रजी खूण - Cs

मेघतळ पातळी उच्च

५००० ते १४००० मीटर

आढळ जगभर  सर्वत्र
काळ संपूर्ण वर्षभर


हे उच्च  पातळीवर आढळणारे, अतिशय विरळ, पांढऱ्या शुभ्र रंगाचे  ढग असून पांढऱ्या स्तरासारखे किंवा पडद्यासारखे दिसतात. हे ढग हिमकणांचे बनलेले असतात. हे ढग कधी कधी संपूर्ण आकाशभर पसरलेले असतात आणि अशा वेळी आकाश निळे न दिसता थोडेसे दुधाळलेले दिसते[]. वातावरणात तंतुमेघांची संख्या वाढल्यास ते एकमेकांना जोडले जाऊन पडद्यासारखे असे ढग तयार होतात. खूप विरळ असल्यास त्यांचे अस्तित्त्व बऱ्याचदा लक्षात येत नाही. पहाटे किंवा संध्याकाळी हे ढग गुलाबी दिसतात आणि त्यामुळे होणाऱ्या सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे दृश्य नेहमी नयनरम्य असते. सूर्य किंवा चंद्र झाकण्याएवढी ह्या ढगांची जाडी नसते त्यामुळे हे ढग आकाशात असतानाही सूर्यचंद्राचे दर्शन होतच राहाते व अशावेळी सूर्याभोवती तेजोवलय किंवा प्रभामंडळ दिसते.[] रात्री काहीवेळा पांढरेशुभ्र पण क्वचित रंगीतही असे खळे चंद्राभोवती पडलेले दिसते. काही वेळा ह्या ढगातून सूर्याभोवती पडलेले २२° खळे [ २२° Halo] दिसू शकते.[]. दिवसा हे ढग असल्यास त्यातून सूर्यप्रकाश येतच राहतो पण त्यापासून सावल्या पडण्याएवढा तो तेजस्वी नसतो.

तंतुस्तर ढगांचे आगमन हे प्रतिकूल हवामानाचे एक लक्षण मानले जाते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b DK Earth The Definitive Visual Guide. 2013. p. 481. ISBN 978-1-4093-3285-5.
  2. ^ a b उच्च पातळीवरील मेघ तंतुस्तर मेघ. मराठी विश्वकोश.