इंग्रजी नाव - Altostratus Cloud

संक्षिप्त इंग्रजी खूण - As

मेघतळ पातळी मध्य

२००० ते ७००० मीटर

आढळ जगभर  सर्वत्र
काळ संपूर्ण वर्षभर
मध्यस्तरी मेघांची आकाशात झालेली दाटी

हा मध्य पातळीवर आढळणारा राखाडी किंवा निळसर काळ्या  रंगाचा ढग मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेला असून अनेक थरांचा बनलेला असतो आणि कधी कधी सर्व आकाश व्यापून टाकण्याएवढा मोठा असू शकतो. ढगाच्या वरच्या भागात मात्र हिमकण आढळून येतात. ह्या ढगातून सूर्य किंवा चंद्र दिसू शकत नाहीत मात्र मध्ये मध्ये असलेल्या विरळ तुकड्यातून काही काळ त्यांची फिकट तबकडी दिसू शकते.  संपूर्ण आकाशभर पसरलेले असल्यास हे ढग लांबलचक पडद्यासारखे दिसतात.[१]

आकाश ह्या प्रकारच्या जाड ढगांनी व्यापले असेल तर ती  हलक्या पण दीर्घकाळ पावसाची पूर्वसूचना मानली जाते.[२]

संदर्भसंपादन करा

  1. ^ DK Earth The Definitive Visual Guide. Sept 2013. पान क्रमांक 480. आय.एस.बी.एन. 978-1-4093-3285-5. 
  2. ^ मध्य पातळीवरील मेघ - मध्यस्तरीमेघ. मराठी विश्वकोश.