पुणे येथून १३ मार्च २०१९ रोजी दिसलेले राशिमेघ
राशीमेघांमुळे दिसलेला छाया प्रकाशाचा खेळ

इंग्रजी नाव - Cumulus Cloud

इंग्रजी खूण - Cu

मेघतळ पातळी निम्न

भृपृष्ठ ते २००० मीटर

आढळ सर्व जगभर पण दमट हवामानात जास्त प्रमाणात.
काळ संपूर्ण वर्षभर पण उन्हाळ्यात आढळ जास्त

निम्न पातळीवर आढळणारे हे राशीमेघ जलबिंदू किंवा अतिशीत जलबिंदू किंवा हिमकणांचे  किंवा ह्या सर्वांच्या मिश्रणाचे बनलेले आढळून येतात. ह्यांचा आकार कापसाच्या राशी एकमेकावर ठेवल्याप्रमाणे असून ढगांच्या कडा स्पष्ट ओळखू येतात. ढगांचा तळ एकाच क्षितिजसमांतर पातळीत आढळून येतो. शिखराचा भाग घुमट किंवा मनोऱ्याप्रमाणे दिसतो पण ढग फार उंच वाढल्यास वरच्या भागाचे फुलकोबीशी साम्य वाटू शकते.[१] विमानातून पाहताना वरून सूर्यप्रकाशात नाहून निघालेले खाली पसरलेले  हे ढग पांढरेशुभ्र दिसतात. मात्र जमिनीवरून पहिले असताना डोक्यावर आलेल्या ह्या ढगांचा तळ काळसर दिसतो व कडा रंगीत दिसतात[१]. राशीमेघ हे एकएकटे, एका पाठोपाठ रांगेत किंवा मोठ्या समूहात आढळू शकतात.

राशीमेघ हे आर्द्र हवेत ऊर्ध्वगामी वातप्रवाहामुळे निर्माण होतात[२].

राशीमेघ हे चांगल्या हवेचे निदर्शक मानले जातात.[३] त्यातून वृष्टी सहसा होत नाही पण त्यांचे रूपांतर इतर प्रकारच्या ढगात होऊन उदा. वर्षास्तरी किंवा गर्जन्मेघ,  नंतर वृष्टी होऊ शकते.

  1. a b मेघ -राशीमेघ. मराठी विश्वकोश. 
  2. ^ DK Earth The Definitive Visual Guide. Sept 2013. पान क्रमांक 478. आय.एस.बी.एन. 978-1-4093-3285-5. 
  3. ^ "Weather Glossary". The Weather Channel. Archived from the original on 17 October 2012. Retrieved 18 October 2012.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)