मुख्य मेनू उघडा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मृग नक्षत्राचे चित्र - मृगाचे चार खूर ठळकपणे दिसतात

मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायनिस; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र मिथुन राशीचा घटक मानले जाते.

नक्षत्र Astrologia-tynkä.jpg
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती

मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रातले राजन्य, काक्षी हे ठळक व राक्षसी तारे आपले लक्ष आपोआपच वेधून घेतात. याच नक्षत्रात ओरायन आणि घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा हॉर्स हेड नेब्यूला आहे.

दंतकथासंपादन करा

तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत.

ग्रीक दंतकथासंपादन करा

ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टौरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलं. ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१]

भारतीय दंतकथासंपादन करा

सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडतो, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागतो. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देव व्याधाला (रुद्र) किंवा लुब्धकाला (शिकारी) धाडतात. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). तसेच शतपथ ब्राह्मणातही ही कथा येते.

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • ^ परांजपे, अरविंद (१८ जानेवारी, २०१६). "तारकासमूहांच्या कथा". साप्ताहिक सकाळ. १४ मार्च, २०१६ रोजी पाहिले.