मुफ्ती महंमद सईद
मुफ्ती महंमद सईद (१२ जानेवारी १९३६ - ७ जानेवारी २०१६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते २००२-०५ व २०१५-१६ ह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री राहिले होते.
मुफ्ती महंमद सईद | |
कार्यकाळ १ मार्च २०१५ – ७ जानेवारी २०१६ | |
मागील | राष्ट्रपती राजवट |
---|---|
पुढील | राष्ट्रपती राजवट |
कार्यकाळ २ नोव्हेंबर २००२ – २ नोव्हेंबर २००५ | |
मागील | राष्ट्रपती राजवट |
पुढील | गुलाम नबी आझाद |
कार्यकाळ १९८९ – १० नोव्हेंबर १९९० | |
पंतप्रधान | व्ही.पी. सिंग |
मागील | बुटासिंग |
पुढील | चंद्रशेखर |
जन्म | १२ जानेवारी, १९३६ बिजबेहारा, अनंतनाग जिल्हा |
मृत्यू | ७ जानेवारी, २०१६ (वय ७९) नवी दिल्ली |
राजकीय पक्ष | जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (१९९९ - २०१६) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९ पर्यंत) |
नाते | मेहबूबा मुफ्ती (मुलगी) |
गुरुकुल | अलीगढ मुस्लिम विद्यापीठ |
धर्म | मुस्लिम |
२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, भारतीय जनता पक्षाला २५ तर नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदावर आली.