मिल्टन फ्रीडमन

(मिल्टन फ्रिडमन या पानावरून पुनर्निर्देशित)

मिल्टन फ्रीडमन (इंग्लिश: Milton Friedman ;) (३१ जुलै, इ.स. १९१२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - १६ नोव्हेंबर, इ.स. २००६:सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ, लेखक व प्राध्यापक होता. तो शिकागो विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला इ.स. १९७६ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[] त्यानी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

मिल्टन फ्रीडमन

जन्म ३१ जुलै, १९१२ (1912-07-31)
ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका
मृत्यू १६ नोव्हेंबर, २००६ (वय ९४)
सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका
नागरिकत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
कार्यसंस्था हूवर इन्स्टिट्यूशन (इ.स. १९७७ - इ.स. २००६)
शिकागो विद्यापीठ (इ.स. १९४६ - इ.स. १९७७)
कोलंबिया विद्यापीठ (इ.स. १९३७ - ४१, इ.स. १९४३ - ४५, इ.स. १९६४ - ६५)
प्रशिक्षण कोलंबिया विद्यापीठ, (पीएच.डी.), इ.स. १९४६
शिकागो विद्यापीठ (एम.ए.), इ.स. १९३३
रटगर्स विद्यापीठ (बी.ए.), इ.स. १९३२
पुरस्कार नोबेल पारितोषिक

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1976" (इंग्रजी भाषेत). १४ जून २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन