माहेरची साडी
माहेरची साडी (१९९१) हा एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके (दिवंगत मराठी चित्रपट दिग्गज दादा कोंडके यांचे पुतणे) यांनी केले होते. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत ₹१२ कोटी (US$1.6 दशलक्ष)ची कमाई केली, ज्यामुळे तो सर्वकाळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला. त्यावेळच्या कोणत्याही मराठी चित्रपटापैकी ही सर्वाधिक कमाई होती.
माहेरची साडी | |
---|---|
दिग्दर्शन | विजय कोंडके |
निर्मिती | विजय कोंडके |
प्रमुख कलाकार |
|
छाया | चारुदत्त दुखांडे |
संगीत | अनिल मोहिते |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९९१ |
एकूण उत्पन्न | ₹ १२ कोटी ($१७ लाख) |
|
माहेरची साडी चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ प्रतिष्ठित प्रभात टॉकीजवर चालला.[१] हा चित्रपट एक कौटुंबिक विषयावरील फॅमिली ड्रामा आहे. हा अत्यंत यशस्वी राजस्थानी चित्रपट "बाई चली ससरीये" (1988)चा रिमेक होता, ज्याचा नंतर 1994 मध्ये जुही चावला आणि ऋषी कपूर यांना घेऊन साजन का घर म्हणून हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला.
कलाकार
संपादनसंगीत
संपादनअनिल मोहिते यांनी चित्रपटाला संगीत दिले. चित्रपटाची गाणी त्या काळी प्रचंड गाजली. लोक गाणी ऐकताना डोळे पुसायचे. आजही "माझं सोनुलं सोनुलं..माझं छकुलं छकुलं" हे गीत लोकप्रिय आहे.
- "आज लक्ष्मीचं रूप कसं दिसतं साजीरं" 4:07
- "भावासाठी धावा करते, आई अंबे जगदंबे" 5:04
- "दुभंगली धरणी माता, फाटले आकाश गं" 8:22
- "दुभंगली धरणी माता, फाटले आकाश गं(2)" 1:21
- "काल सपनामागी, माझा सजना गं" 5:30
- "माझं सोनुलं सोनुलं, माझं छकुलं छकुलं" 4:24
- "सासरला ही बहिण निघाली" 7:18
लिगसी
संपादनमराठीतील अजरामर चित्रपटांत याची गणना होते. लोक हा चित्रपट पाहताना खूप रडायचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट पोहचला.
लोक सांगतात, सिनेमाच्या थिएटरमध्ये जेव्हा कुणी मागे वळून पाहिले तर अक्षरशः अख्खं थिएटर रडताना दिसायचं.
लोकांना चित्रपट एवढा प्रचंड आवडला की लग्नाचं वऱ्हाड असल्यासारखं वाहने करून लोक जवळच्या शहरात खास चित्रपट पाहण्यासाठी जात.
संदर्भ
संपादन- ^ "Originally new". punemirror.com (इंग्रजी भाषेत). 2015-09-11. 2022-01-06 रोजी पाहिले.