विजय कोंडके
मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक
विजय कोंडके (१५ जुलै, १९४९ - ) हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते दिवंगत मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता दादा कोंडके यांचे पुतणे आहेत. माहेरची साडी या चित्रपटासाठी ते ओळखले जातात.[१]
विजय कोंडके | |
---|---|
जन्म |
विजय कोंडके १५ जुलै, १९४९ |
निवासस्थान | महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | दिग्दर्शक |
प्रसिद्ध कामे | माहेरची साडी |
नातेवाईक | दादा कोंडके (काका) |
विजय हे अखिल भारतीय चित्रपट महामंडाळाचे अध्यक्ष राहिले आहेत.[२]
दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटांचे वितरण विजय कोंडकेंनी केले होते. तसेच आघाडीचे चित्रपट वितरक म्हणून त्यांनी नाव कमावले.[३]
माहेरची साडी या सुपरहिट चित्रपट नंतर ते लवकरच दुसरा चित्रपट एप्रिल २०२४ मध्ये घेऊन येत आहेत, "लेक असावी तर अशी".[४]
संदर्भ
संपादन- ^ "Vijay Kondke". IMDb (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "विजय कोंडकेंवर अविश्वास ठराव". Maharashtra Times. 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "Dada Kondke was exactly like his on-screen characters - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.
- ^ "Lek Asavi Tar Ashi Movie (2024): Cast, Trailer, OTT, Songs, Release Date | लेक असावी तर अशी | Exclusive 2024 - Rang Marathi". Rang Marathi. 4 एप्रिल 2024 रोजी पाहिले.