माडिया गोंड
माडिया गोंड किंवा माडिया किंवा मारिया ही महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा आणि भारताच्या छत्तीसगड राज्यातील बस्तर विभागात राहणाऱ्या स्वजमातीत विवाह करणाऱ्या गोंड जमातींपैकी एक आहे. [१] त्यांना भारत सरकारने सकारात्मक कृती किंवा आरक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष असुरक्षित आदिवासी गटांचा दर्जा दिला आहे. [२] माडिया गोंडांवर नक्षलवादी कारवायांचा जोरदार प्रभाव दिसतो. [३] माडिया गोंड स्वतःचे पदनाम माडिया वापरतात आणि ते राहत असलेल्या भागाला माडिया देश म्हणतात. [४] ते गोंडीची माडिया बोली बोलतात. [५] माडिया कुमरी शेती म्हणजे झुम शेती अथवा फिरस्ती शेती करीत ज्यावर आता निर्बंध आलेला आहे.</br> एका अभ्यासात माडिया गोंडांमधील सद्यस्थितीतील मेगालिथिक पद्धतींचा उल्लेख आहे. [६] 1997-1998 मध्ये करण्यात आलेल्या बेंच मार्क सर्वेक्षणातील एक निष्कर्ष: माडिया गोंड कुटुंबांपैकी 91.08 टक्के दारिद्र्यरेषेखाली राहतात. [७]
परंपरा आणि संस्कृती
संपादनमाडिया आज डॉक्टर, [८] शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि नक्षलवादी आहेत. [९] शाळेत जाणाऱ्या माडिया मुलांची प्रगती महाराष्ट्र राज्यातील इतर मुलांच्या बरोबरीने आहे. एका माडिया विद्यार्थिनीने राज्य स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. [१०] ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नोंदवलेल्या जिल्हा राजपत्रातील माडिया गोंडाचे वर्णन स्वतंत्र भारताच्या राजपत्रात खालीलप्रमाणे आलेले आहे.
चांदा जिल्हा राजपत्रात वर्णन
संपादनचंद्रपूर जिल्हा राजपत्रात माडियाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
माडीया जंगली प्रदेशात राहतात आणि त्यांच्या अकृत्रिम जीवन शैलीत ते अतिशय आकर्षक आहेत. गावे सहसा काही विस्तीर्ण उथळ प्रवाहाजवळ जंगलात खोलवर वसविली जातात, जेणेकरून गाटा लागवड सोईची होते , [nb 1] आणि आजूबाजूचे जंगल त्यांच्या कृषी प्रयत्नांना पूरक होते. काही खेड्यांमध्ये ताडीच्या परंपरागत वृक्षवाटिका - पाम वाईनची झाडे नसतात. या वृक्षांपासून मिळणारा रस, आंबवलेला किंवा न आंबलेला, गोंडाना नेहमीच हवा असतो. माडीया पुरुष हे चपळ , कामसू , उत्तम शरीर सौष्ठव असलेले, खुल्या दिलाचे, मनमिळावू आणि हसरे आनंदी आहेत. त्यांचा पोशाख तुटपुंजा असतो, जी लंगोटी आणि धोतर यांच्यातील तडजोड असते, कापडाची एक पट्टी कमरेला दोरीसारखी घट्ट बांधलेली, दोन पायांच्या मधून जाऊन त्याचे मोकळे टोक गुडघ्याच्या खाली लटकलेले असते. बऱ्याचदा हे वस्त्र लहान होऊन चिंधी प्रमाणे असते. ते त्यांच्या गळ्यात मण्यांच्या सुंदर माळा आणि कधीकधी हातात धातूच्या आणि काचेच्या बांगड्या घालून सजतात. कान सजविण्यासाठी ते कानाच्या पाळीत असंख्य पितळी वळे घालतात ज्यांच्या वजनाने कान ओढल्या जाऊन विद्रूप दिसतात. ते कधीकधी डोक्यावर पगडी घालतात. त्याच्या कमरेच्या कपड्यात पितळी हँडल असलेला वक्र चाकूअडकवलेला असतो आणि खांद्यावर सहज वापरता येणारी कुऱ्हाड नेहमीच लटकवलेली असते, ज्याशिवाय गोंड क्वचितच फिरतो. माडीया स्त्रिया सामान्यतः पांढऱ्या मजबूत कपड्याचे लुगडे घालतात ज्याची किनार रंगीत असते. गोंड स्त्री कधीही चोळी (ब्लाऊज) घालत नाही. त्या पतींप्रमाणे गळ्यात मण्यांच्या माळा घालून सजतात. ते नेहमी त्यांचे चेहरे आणि हातपाय गुंतागुंतीच्या आकृत्यांनी गोंदवतात." [१]
नृत्य
सर्व गोंड आणि विशेषतः माडिया यांना नृत्याची खूप आवड असते. लोकांसाठी ही मोठी करमणूक असते. पूर्वेकडील उष्ण हवामानाच्या भागात , थंड चंद्रप्रकाशाच्या रात्री मागून रात्री, गोंडी भाषेतील लयबद्ध सांघिक सुरावट हवेत भरलेली असते, कारण गावाजवळील मोकळ्या जागेत गावकरी आगीभोवती नाचत असतात. आवडते नृत्य म्हणजे ज्यात पाय ओढत पुढे आणून लाटेचा भास निर्माण करणारे पाऊल, जे एकट्याने केले तेव्हा ते फारसे आकर्षक वाटत नाही, परंतु 'रे-ला', 'रे -ला' कोरस गाणाऱ्या नर्तकांच्या मोठ्या रिंगणात एकत्रितपणे केले जाते तेव्हा ते अगदी वेगळा परिणाम निर्माण करते, कारण त्यात ठेका साधल्या जातो. ज्या गावांमध्ये गावाचा प्रमुख, मनोरंजनासाठी उत्साही असतो तिथे विशेष सराव केलेला गट ढोलाच्या ठेक्यावर विचित्र आणि अद्भुत स्टेप डान्स करतो. मोठ्या नृत्याच्या वेळी, विशेष सराव केलेला गट आगीच्या भोवती आतील रिंगण व्यापतो, तर इतर लोक, पुरुष आणि स्त्रिया , वेगळ्या रिंगणात विरुद्ध दिशेने मोठ्या वर्तुळात फिरतात. सर्वजण खास प्रसंगी घालावयाच्या पोशाखात, हातात विकरकामाचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने, गळ्यात फुलांच्या माळा आणि केसात पिसांचे दागिने विनोदी पद्धतीने खोचलेले किंवा लज्जतदारपणे घातलेले असतात. प्रचंड आगीच्या लखलखाटात नर्तकांच्या चमकदार मण्यावरील आणि वन्य पद्धतीच्या दागिन्यांवरील चमक, ढोल-ताशांच्या तालावर आणि अनेक पायांच्या ठेक्यातील थापाने सामूहिक गानामधील स्वरांच्या वन्य संगीताशी एकरूप होऊन हलणारे, माडिया नृत्य, हा एक देखावा आहे जो सहजासहजी विसरला जात नाही, परंतु जेव्हा इतर तपशील स्मृतीतून पुसल्या जातो तेव्हा एक वैशिष्ट्यपूर्ण दृश्य म्हणून हे रेंगाळत राहते. पुरुष आणि स्त्रिया सामान्यतः वेगळ्या वर्तुळात नृत्य करतात परंतु ज्या नृत्यांमध्ये तरुण पुरुष त्यांच्या वधू निवडतात, तेंव्हा जोडप्यांमध्ये नृत्य करतात. [१]
घोटुल
संपादनतरुणांसाठी सामूहिक घर किंवा घोटूल हे माडिया गोंड संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. पारंपारिकपणे प्रत्येक गावात माडियांचे एक घोटूल असते जिथे अविवाहित मुले आणि मुली संध्याकाळी एकत्र जमतात आणि रात्री उशिरापर्यंत खेळतात, मिसळतात, नाचतात आणि गातात परंतु झोपण्यासाठी त्यांच्या घरी परततात, जे बस्तर घोटुल आणि माडिया गोंडांचे घोटुल यांच्यातील फरक दर्शविते. विवाहित महिलांनी घोटुलमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. [११]
सरकारचे दारू धोरण
संपादनसरकारने आदिवासींना एका वर्षाच्या कालावधीसाठी (म्हणजे प्रत्येक वर्षी जुलै ते जून) ताडी परवाने मिळवून घरगुती वापरासाठी ताडी तयार करण्याची आणि ठेवण्याची सवलत दिली आहे. हा विशेषाधिकार या समाजातील लोकांना देण्यात आला आहे कारण त्यांना त्यांच्या अन्नाचा एक भाग म्हणून ताडी पिण्याची पूर्वापार सवय आहे. त्या क्षेत्रामध्ये आता लागू असलेल्या अबकारी व्यवस्थेनुसार, प्रत्येक स्वतंत्र अर्जदाराला घरगुती वापरासाठी 1 ते 5 पर्यंतच्या झाडांपासून ताडी काढण्याचा परवाना दिला जातो. ताडीच्या झाडावर परवानगी शुल्क आणि वृक्ष कर अनुक्रमे 75 पैसे प्रतिवर्ष लागू आहे. [१]
मुंढा
संपादनलग्न ठरल्यानंतर वराने कोरीव काम केलेला मुंढा हा एक सजावटीचा लाकडी खांब असतो . त्याच्या लग्न समारंभाचे वेळी लाकडाच्या कोरीव कामातील कौशल्याचे ते उत्तम उदाहरण म्हणून ते घोटूल च्या समोर ठेवले जाते. हे अमेरिकेच्या टोटेम खांबांची आठवण करून देते. [१२]
समज
संपादनमासिक पाळीबद्दल, मारिया गोंडचा असा समज आहे की योनीमध्ये एकेकाळी दात असायचे आणि जेव्हा हे दात काढून टाकले गेले तेव्हा जखम पूर्णपणे बरी झाली नाही [१३]
समकालीन जीवनशैली
संपादननक्षल कारवाया
संपादनएका फ्रंटलाइन कव्हर स्टोरी मध्ये जेथे माडिया गोंड आदिवासी राहतात त्या भामरागड तालुक्याला महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त प्रदेशाचे मुख्य केंद्र म्हणले गेले आहे. पूर्व गडचिरोलीतील जंगल आणि नक्षलग्रस्त 120 गावांमध्ये अतिरेकी हिंसाचाराची किंमत आदिवासींनाच चुकवावी लागते. "पोलिस असो की नक्षलवादी, त्यांच्या दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात आदिवासीच अडकतात. हुकूम करणारे कधीच आदिवासी नसतात. ते त्यांच्या कार्यालयात किंवा लपण्याच्या ठिकाणी सुरक्षित असतात,” असे भामरागड येथील एका रहिवाश्याने म्हटल्याचे लेखात नमूद केले आहे. या लेखात पोलिसांनी असे म्हटल्याचे उद्धृत केले आहे की भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चे सुमारे 250 पूर्णवेळ सदस्य आणि जवळपास 3,000 स्थानिक समर्थक आहेत. असे . खबऱ्या असल्याचा आरोप ठेवून अनेक आदिवासींना नक्षलवाद्यांकडून मारले जाते किंवा पोलिसांकडून त्रास दिला जातो. सतत भीती असूनही, आदिवासी मान्य करतात की नक्षलवाद्यांनी कंत्राटदारांना तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी आणि बांबू तोडण्यासाठी जास्त मजुरी देण्यास भाग पाडले आहे. वनखाते, पोलिस, सरकार, कंत्राटदार यांनी केलेल्या शोषणाविरुद्ध न्याय व कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे माडिया गोंडांना नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण होते. पोलिसांकडून होणाऱ्या छळामुळे अनेक नक्षलवादी सहानुभूतीदार भूमिगत होतात. [१४]
एका नक्षलवाद्याचा जन्म
संपादन'एका नक्षलवाद्याचा जन्म ', विलास बाळकृष्ण मनोहर, लोक बिरादरी प्रकल्पाचे स्वयंसेवक यांनी लिहिलेली ही कादंबरी माडिया गोंड जुरूच्या जीवनाच्या अनिच्छेने झालेल्या प्रवासाचे, एका शोषित निनावी आदिवासीपासून ते नक्षलवादी, कायद्यापासून पळून गेलेला अशा त्याच्या रूपांतराचे काल्पनिक वर्णन आहे. . [१५]
तेंदू पत्ता : तोड
संपादनया गरीब पूर्व महाराष्ट्र जिल्ह्यातील गरिबांसाठी तेंदूपत्ता, किंवा Diospyros melanoxylon [१६] चे पान (खजूरासारखे फळ असलेले काळ्या खोडाचे झाडाचे पान) ज्यामध्ये तंबाखू भरून बीडी वळवली जाते, उदरनिर्वाहासाठी नगदी कमाईचे एक महत्त्वाचे साधन आहे. उन्हाळा जेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचतो, तेव्हा माडियासाठी कमाईचा उत्तम काळ असतो. दर उन्हाळ्यात हजारो आदिवासी महिला आणि मुले तेंदूपत्ता गोळा करण्यात गुंतलेली असतात. महिला व मुले पहाटे ४.३० वाजता उठून आपल्या गावाजवळील जंगलाकडे चालत जातात. काही वेळातच जंगलांचे रूपांतर मधमाश्यांच्या वर्दळी सारखे होते, स्त्रिया आणि मुलांचे छोटे सैन्य तेंदूपत्ता अगदी अचूकपणे तोडत असतात. 11 च्या सुमारास तोडण्याचे सत्र संपले म्हणजे स्त्रिया आणि मुले त्यांच्या डोक्यावरील पानांचे वजन तोलत परत जातात. गावांमध्ये परत येऊन स्त्रिया त्यांच्या झोपड्यांमध्ये तासनतास बसून पानांची छाटणी करतात आणि पानांची पुडकी बांधतात. त्याच मोठ्या प्रमाणात काम करतात; त्यांनाच कडक उन्हाचे चटके सहन करून कष्ट उपसावे लागतात. दिवसभराचे तेंदूपत्त्याचे संकलन अंदाजे साडेचार वाजता बाजारात किंवा फडात नेले जाते आणि कडक उन्हाने तापलेल्या शेतात किंवा कोरड्या नदीच्या खोऱ्यात लांब रांगात ही पुडकी व्यवस्थितपणे ठेवली जातात. ही जागा काही एकर असते. खाजगी कंत्राटदारांनी नियुक्त केलेले पुरुष पुडकी मोजतात आणि पुढील पैसे वाटपासाठी त्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करतात. रजिस्टरमधील नावे पुरुषांची असतात. कष्टकरी महिलांचे पती आणि मुलांचे वडीलच या पैशांवर हक्क सांगतात. जरी तेंदूपत्ता हंगाम दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत नसला तरी, प्रत्येक सक्षम कुटुंब या काळात लक्षणीय कमाई करू शकते. तेंदूपत्ता अशा प्रकारे गरिबांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन महिने टिकून राहण्यासाठी पुरेसे पैसे मिळवण्यास मदत करते. [१७]
स्त्रियांची स्थिती
संपादनमाडिया गोंड मुलीला विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवण्याचे आणि पती निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. जर पती तिला वाईट वागणूक देत असेल किंवा तिला त्याच्यापासून मूल होऊ शकत नसेल तर विवाहित स्त्री या नात्याने तिला घटस्फोट घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तिला तिची कमाई खर्च करण्याचा अधिकार आहे. पती तिच्या कामात ढवळाढवळ करत नाही. तथापि, मासिक पाळीच्या काळात या महिलांना देखील निषिद्ध मानले जाते आणि त्यांना सणांमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही.
संबंधित संस्था
संपादन- गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात जिथे अनेक माडिया गोंड राहतात तिथे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारी लोक बिरादरी प्रकल्प ही एक स्वयंसेवी संस्था आहे. त्याची स्थापना 1973 मध्ये झाली [१८] लोक बिरादरी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना 2008 चा रॅमन मॅगसेसे अवार्ड फॉर कम्युनिटी लीडरशिप हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराच्या उद्धरणात विश्वस्त मंडळाने म्हणले आहे की :
उपचार आणि शिक्षण आणि इतर अनुकंपायुक्त कामाद्वारे माडिया गोंडांची स्वतःला आजच्या भारतात सकारात्मकतेने जुळवून घेण्याची क्षमता वाढविण्याच्या कार्याला विश्वस्त मंडळ दाद देते . [१९]
- द ट्रायबल कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया फाऊंडेशन : 2008 मध्ये अमस्टरडॅम , नेदरलँड्स येथे स्थापित [२०]
- समाज आरोग्यासाठी शिक्षण, कृती आणि संशोधन यासाठी शोध सोसायटी. [२१]
आरोग्य समस्या
संपादनऐतिहासिकदृष्ट्या माडिया गोंड हे चेचक, त्वचा रोग आणि गोंडी रोग नावाच्या कुष्ठरोगाच्या सौम्य स्वरूपाचे बळी होते. [१] माडिया गोंडांमध्ये सिकलसेल ॲनेमियाचे प्रमाण खूप जास्त आहे. [२२]
संशोधन अभ्यास
संपादनमाडिया गोंडांना आदिम जमातीचा दर्जा असल्याने ते विविध अभ्यासाचा विषय बनले आहेत , जसे की:
अनुवांशिक विविधता
संपादनगोंडी भाषा बोलणारे महाराष्ट्रातील माडिया गोंड आणि इतर तीन मराठी भाषिक प्रोटो - ऑस्ट्रॅलॉइड आदिवासी गटांमध्ये, त्यांची अनुवांशिक रचना समजून घेण्यासाठी आणि भाषा आणि जनुक पूल यांच्यातील एकरूपता ओळखण्यासाठी मायक्रोसेटेलाइटच्या विविधतेचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यास केलेल्या जमातींमधील 15 Short tandem repeat (STR) loci येथील <a href="https://en.wikipedia.org/wiki/Allele" rel="mw:ExtLink" title="Allele" class="cx-link" data-linkid="213">Allele frequency data</a>ची तुलना 22 इंडो-युरोपियन- आणि द्रविडीयन-भाषिक जाती आणि आदिवासी लोकसंख्येच्या डेटाशी heterozygosity, allele size variance, analysis of molecular variance (AMOVA), GST (Glutathione S-transferase) estimate, PC plot, and Mantel correlation test वापरून तुलना केली गेली. परिणामतः असे दिसते की गोंड जमात जिच्यात माडिया-गोंड या शिकारी-संकलक लोकसंख्येचा समावेश आहे तिच्यात सांस्कृतिक आणि अनुवांशिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मराठी आदिवासी गटांपेक्षा कमी विविधता आहे. प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड आदिवासी लोकसंख्या जनुकीयदृष्ट्या समान morphology असलेल्या जातींपासून भिन्न होती, जीवरून हे सूचित होते की लोकसंख्येवर भिन्न उत्क्रांती यंत्रणा कार्यरत आहे. विविध स्थलांतरित इतिहास असलेल्या काही गटांना वगळून, लोकसंख्येत अनुवांशिक आणि भाषिक समानता आढळली. समकालीन भारतातील लोकसंख्येच्या अनुवांशिक विविधतेला आकार देण्यासाठी भाषिक, भौगोलिक समीपता आणि सूक्ष्म उत्क्रांती प्रक्रियांसह सामाजिक-सांस्कृतिक घटकांमधील परस्परसंवाद <a href="https://en.wikipedia.org/wiki/Microsatellite_(genetics)" rel="mw:ExtLink" title="Microsatellite (genetics)" class="mw-redirect cx-link" data-linkid="227">microsatellite</a> भिन्नता स्पष्टपणे दर्शवते .[२३]
स्त्रीमुक्ती
संपादनहा अभ्यास खालील घटनांचे दस्तावेजीकरण आणि विश्लेषण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बागुल गावात एक बचत गट स्थापन करण्यासाठी माडिया महिलांनी एकत्र येणे, त्यांच्या स्वातंत्र्याची इतरांना ठामपणे जाणीव करून देणे, माडिया प्रथा मोडणे ज्यामुळे गटातील एका सदस्याला तिच्या पतीकडून क्रूर वागणूक देऊन तिची नग्न धिंड काढणे, तिची आत्महत्या, त्यानंतर इतर सदस्यांचे निषेधासाठी एकत्र येणे, आदिवासींनी निषिद्ध मानलेल्या बाबींचे नियम तोडणे, ब्लाउज घालण्याचा घेतलेला निर्णय आणि मासिक पाळीच्या काळात विलगीकरण आणि प्रदूषणाचे नियम मोडणे, सरकारी विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला पुढाकार. माडियांचा विकास आणि मुख्य प्रवाहात समावेश होत असल्याने नक्षलवाद्यांना त्यांचा प्रभाव कमी होण्याची भीती. स्वयं सहाय्य बचत गटाच्या उपक्रमांना त्यांचा विरोध. एका अभियंत्याची नक्षलवाद्यांकडून हत्या. नक्षलवादी, राजकारणी आणि नोकरशाहीच्या रूपात गरिबी, पूर्वग्रह, पुरुषी वर्चस्व आणि निहित स्वार्थाविरुद्ध माडिया महिलांनी सुरू केलेला संघर्ष. [२४]
बेंच मार्क सर्वेक्षण 1997-98
संपादनमाडिया गोंडशी संबंधित महाराष्ट्र राज्यातील आदिवासी भागात आयोजित करण्यात आलेल्या बेंच मार्क सर्वेक्षणाचे निकाल खाली सारणीबद्ध केले आहेत. [nb 2] [७]
लोकसंख्या
स्त्री | पुरुष | एकूण |
---|---|---|
३८७४९ | ३८१५६ | ७६९०५ |
साक्षरता
स्त्री | पुरुष | एकूण |
---|---|---|
३०.१९ | १६.०९ | २३.१९ |
कुटुंबनिहाय व्यवसाय
शेती | शेतमजूर | वनमजुर | इतर | एकूण | स्थलांतर % | बीपीएल % |
---|---|---|---|---|---|---|
१०४४४ | 2260 | ३६५ | 282 | १३३५१ | ३४ | ९१.०८ |
तळटीपा
संपादन- ^ a b c d Chanda District Gaztteer
- ^ "SHABARI ADIVASI VITTA VA VIKAS MAHAMANDAL". 2018-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ Malekar, Anosh (June 2006). "Gadchiroli: Inside the Red Line". InfoChange News & Features. रोजी मूळ पानापासून संग्रहित22 September 2009. 2009-03-05 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ Manohar V. B, Eka Nakshalwadya cha Janma
- ^ "Maria". Ethnologue. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ Anuja, Geetali (2002). "Living Megalithic practices amongst the Madia gonds of Bhamragad, District Gadchiroli, Maharashtra". Purātattva. 32 (1): 244. 10 May 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2009 रोजी पाहिले.
- ^ a b "Archived copy" (PDF). 19 March 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-02-25 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "..:: Lok Biradari Prakalp ::." lokbiradariprakalp.org. 2008-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Yahoo! Groups". 2012-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ .The School that Built Many Lives, By Brishti Bandyopadhyay Archived 2004-03-12 at the Wayback Machine.
- ^ Bhanu, B. V. (2004). People of India. ISBN 9788179911006. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "TRTI, Tribal Handicraft". trti.mah.nic.in. 2009-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ .Linke, Uli (October 1992). "Manhood, Femaleness, and Power: A Cultural Analysis of Prehistoric Images of Reproduction". Comparative Studies in Society and History. Uli Linke. 34 (4): 579–620. doi:10.1017/s0010417500018004. JSTOR 179348.
- ^ Guerilla zone, Cover Story, Frontline, Volume 22 – Issue 21, Oct. 08 – 21, 2005 DIONNE BUNSHA in Gadchiroli Archived 2009-02-21 at the Wayback Machine.
- ^ Dutt, Kartik Chandra (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M. ISBN 9788126008735. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ Dyospyros melanoxylon Archived 2008-10-26 at the Wayback Machine.
- ^ "HugeDomains.com – EmpowerPoor.com is for sale (Empower Poor)". 2007-10-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "Lok Biradari Prakalp – People's Brotherhood Project". 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ Ramon Magsaysay Award Foundation. "Ramon Magsaysay Award Foundation". 27 August 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "Tribal Cultural Heritage of India Foundation". 8 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-19 रोजी पाहिले.
- ^ "Abhay Bang & Rani Bang". 2017-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ Dr. S.L. Kate. "Health Problems of Tribal Population Groups from the State of Maharashtra". 27 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 April 2015 रोजी पाहिले.
- ^ Gaikwad, S; Vasulu, TS; Kashyap, VK (February 2006). "Microsatellite diversity reveals the interplay of language and geography in shaping genetic differentiation of diverse Proto-Australoid populations of west-central India". Am. J. Phys. Anthropol. 129 (2): 260–7. doi:10.1002/ajpa.20283. PMID 16323197.
- ^ "No Single Path: Cultural Perspectives in overcoming Domestic Violence". UNIFEM Informs seminar, co-presented by UNIFEM Australia and The Bob Hawke Prime Ministerial Centre at UniSA. Veena Poonacha, Professor and Director, Research Centre for Women's Studies, SNDT Women's University, Mumbai, India. 23 November 2006. 3 July 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-05 रोजी पाहिले.