महापाषाण म्हणजे एक मोठा ऐतिहासिक दगड किंवा पाषाण ज्याचा वापर एखादा स्तंभ, स्मारक किंवा कोणत्या अन्य प्रकारच्या बांधणी साठी होतो. बहुतेकदा याचा वापर स्मारकशिला दफने म्हणून सुद्धा होत असे. स्मारकशिला दफने म्हणजे विशिष्ट आकारात मोठे दगड उभे करणे अथवा दोन उभ्या दगडांवर एक आडवा पाषाण दफनस्थान दर्शविण्यासाठी ठेवणे. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात अशा पद्धतीने मृत व्यक्तींचे दफन करण्याची पद्धत अस्तित्वात होती.

इंग्लंडच्या विल्टशायर काउंटीतील स्टोनहेंज येथील प्रसिद्ध महापाषाण स्मारकशिला दफने

स्वरूप

संपादन

थडग्यामध्ये दगडी शवपेटिकेत मृताचे दफन केले जाई. थडग्याच्या आत वर्तुळाकार दगडे लावली जात व त्यामध्ये दगडी शवपेटिका म्हणजे दगडाची चौकोनी पेटी व त्यात मृताची हाडे व इतर दफनवस्तू ठेवल्या जात. थडग्यातील वस्तूंमध्ये प्रामुख्याने काळी-तांबडी मृत्पात्रे, कुदळ, कोयता,छोटी हत्यारे, घोड्याचा साज यांचा समावेश असे. आत्तापर्यंत आढळलेली सर्व स्मारकशिला दफने ही सुपीक जमिनीच्या जवळच सापडलेली आहेत.

स्मारकशिला दफनांची ठिकाणे

संपादन