मगधी किंवा मगही ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली मगधी भाषा प्रामुख्याने बिहार राज्यात व पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. मगधीची पूर्वज भाषा मगधी प्राकृत ही प्राचीन मगध साम्राज्याची राजकीय भाषा व गौतम बुद्धाची मातृभाषा होती.

मगधी
स्थानिक वापर भारत, नेपाळ
लोकसंख्या १.४ कोटी
भाषाकुळ
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-२ mag
ISO ६३९-३ mag (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

मगधी भाषा हिंदीभोजपुरी भाषांशी साधर्म्य दाखवते.

मगही याची धार्मिक भाषेच्या रूपात ही ओळख आहे. काही जैन धर्मग्रंथ ही मगही भाषेत लिहीले आहेत. मुख्य रूपेण वाचिक परंपराच्या रूपात ही आजपण जीवित आहे. मगही चा पहिला महाकाव्य गौतम महाकवि योगेश द्वारा 1960-62 च्या मध्य लिहिला गेला. दर्जनभर पुरस्कारांशी सन्मानित योगेश्वर प्रसाद सिन्ह हे आधुनिक मगही चे सर्वात लोकप्रिय कवि मानले गेलेत. 23 अक्तुबर ला त्यांची जयन्ति मगही दिवसाच्या रूपात साजरी केली जाते.

मगही भाषा मध्ये विशेष योगदानासाठी सन् 2002 मध्ये डॉ. रामप्रसाद सिंह यांना साहित्य अकादमी भाषा सन्मानाने गौरविले गेले.

काही विद्वानांचे असे मत आहे की मगही संस्कृत भाषा द्वारे जन्मलेली हिन्द आर्य भाषा आहे परंतू महावीर आणि बुद्ध दोघांचे उपदेशांची भाषा मागधी हीच होती. बुद्धाने भाषेची प्राचीनतेच्या प्रश्नावर स्पष्ट म्हणले आहे की‘सा मागधी मूल भाषा' म्हणजे मगही ‘मागधी’ पासून निघालेली भाषा आहे. याची लिपी कैथी आहे.

बाह्य दुवेसंपादन करा