मखमली शिलींध्री
शास्त्रीय नाव | Sitta frontalis (Swainson) |
---|---|
कुळ | (Sittidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Velvet-fronted Nuthatch |
संस्कृत | नील शिलींध्री |
हिंदी | कठफोडिया |
वर्णन
संपादनमखमली शिलींध्री पक्षी हा आकाराने चिमणीपेक्षा लहान, पाठीकडून निळसर जांभळ्या रंगाचा तर पोटाकडून फिकट पांढऱ्या राखाडी रंगाचा असून याच्या कपाळावर आडवा, ठळक, मखमली काळा पट्टा आहे. नराच्या डोळ्याजवळ, भुवईजवळ छोटे काळे पट्टे असतात तर मादीला असे पट्टे नसतात. हा फरक सोडला तर नर-मादी दिसायला अगदी सारखेच.
वास्तव्य/आढळस्थान
संपादनसर्व प्रकारच्या दाट जंगलाच्या भागात आढळणारा मखमली शिलींध्री पक्षी संपूर्ण भारतभर स्थानिक निवासी पक्षी आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया या देशातही तो आढळतो. फक्त हिमालयाच्या पूर्व बाजुकडून आसाम, म्यानमार ते मलेशिया या भागातील याची उपजात थोडी लहान आहे.
खाद्य
संपादनविविध दाणे, बिया, फळातील गीर, कीटक, त्यांच्या अळ्या, सुरवंट, कोळी हे यांचे खाद्य आहे.
प्रजनन काळ
संपादनया पक्ष्यांचा उत्तर भारतातील वीण काळ साधारणपणे एप्रिल ते जून असा असून दक्षिण भारतातील पक्ष्यांचा वीण काळ फेब्रुवारी ते एप्रिल-मे असा आहे. मखमली शिलींध्री या पक्ष्याचे घरटे उंच झाडांच्या ढोलीत, सहसा सुतार वगैरे पक्ष्यांनी सोडून दिलेल्या ढोलीत, पाने, कापूस, पिसे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले असते. अशा घरट्याचे प्रवेशद्वार चिखलाने आवश्यकतेनुसार व्यवस्थीत बंद केलेले असते.
मादी एकावेळी ३ ते ६ पांढऱ्या रंगाची त्यावर लाल किंवा जांभळ्या तुटक ठिपके, रेषा असलेली अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंतची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
चित्रदालन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |