मक्का-मदीना द्रुतगती रेल्वे

मक्का-मदीना द्रुतगती रेल्वे किंवा हरमैन द्रुतगती रेल्वे (अरबी: قطار الحرمين السريع) हा सौदी अरेबिया देशामधील एकमेव द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. ४५३ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग इस्लाम धर्मामधील दोन सर्वात पवित्र स्थळे - मक्कामदीना ह्यांना जोडतो. ह्या मार्गाचा एक छोटा फाटा जेद्दाहमधील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील जोडतो. दरवर्षी हाज यात्रेला येणारे सुमारे ६ कोटी भाविक ही रेल्वे वापरतील असा अंदाज आहे. ह्या रेल्वेमुळे मक्का-मदीना दरम्यानच्या रस्तेवाहतूकीवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.

मक्का-मदीना द्रुतगती रेल्वे
टाल्गो बनावटीची गाडी
स्थानिक नाव قطار الحرمين السريع
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश सौदी अरेबिया
स्थानके
कधी खुला ११ ऑक्टोबर २०१८
मालक चीन रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ४५३ किमी (२८१ मैल)
गेज १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३०० किमी/तास
मार्ग नकाशा

२००९ साली ह्या द्रुतगती मार्गाचे काम् सुरू झाले व २५ सप्टेंबर २०१८ रोजी ह्या मार्गावरील पहिली गाडी धावली. ३०० किमी/तास इतका कमाल वेग असलेल्या ह्या मार्गाच्या बांधकमासाठी चिनी, फ्रेंच व स्पॅनिश कंपन्यांची मदत घेण्यात आली.

प्रमुख शहरे

संपादन

इंजिन व डबे

संपादन

मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेसाठी स्पेनमधील ताल्गो ह्या कंपनीने बनवलेल्या ३५० एस.आर.ओ. प्रणालीच्या गाड्या वापरल्या जातात.

बाह्य दुवे

संपादन