भीमाबाई सकपाळ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई
(भीमाबाई रामजी आंबेडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

भीमाबाई धर्मा पंडित(मुरबाडकर) किंवा भीमाबाई रामजी आंबेडकर, यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 मध्ये आंबेटेंभे या ठिकाणी झाला. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील धर्मा पंडित हे आंबेटेंभे या गावचे होते, मिलिटरी त असल्याने व दळण वळणाच्या गैरसोय मुळे ते मुरबाड येथे स्थलांतरित झाले. ते मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.

माता भीमाई
[[चित्र:‎|‎(212 × 238 pixels]]
माता भीमाई
टोपणनाव: भीमाई
जन्म: १४ फेब्रुवारी १८५४
आंबेटेंभे (ता. मुरबाड जिल्हा. ठाणे )
मृत्यू: २० डिसेंबर १८९६
वडील: धर्माजी पंडित
पती: रामजी मालोजी आंबेडकर
अपत्ये: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले..[]

रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[] रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[] या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला.[] भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.[][][] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले.[] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ.स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[]

सन्मान

संपादन

भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे". Loksatta. 2016-04-14. 2018-03-14 रोजी पाहिले.
  4. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta". www.loksatta.com. 2018-03-14 रोजी पाहिले.
  5. ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
  6. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)