१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९६१ची भारताची जनगणना ही १० वी जनगणना होती. १९६१ मध्ये भारताची लोकसंख्या २२,६२,९३,२०१ पुरुष आणि २१,२९,४१,५७० स्त्रिया अशी एकूण ४३,९२,३४,७७१ (४३ करोड ९२ लाख ३४ हजार सातशे एकाहत्तर) होती. एकूण लोकसंख्या ही १९५१ च्या जनगणनेत मोजलेल्या ३६,१०,८८,०९० लोकांपेक्षा ७,८१,४६,६८१ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५१% जास्त.

१९६१ भारताची जनगणना

१९५११९६०-१९६१ १९७१

सामान्य माहिती
देश भारत
परिणाम
लोकसंख्या ४३,९२,३४,७७१ (२१.५१% )
पूर्वीची लोकसंख्या ३६,१०,८८,०९०
साक्षरता २४.०२%
लिंग गुणोत्तर ९४१
लोकसंख्येची घनता १४२

जनगणना

संपादन

१९६१ च्या जनगणनेनुसार,

  • भारताची एकूण लोकसंख्या - ४३,९२,३४,७७१ (४३ करोड ९२ लाख ३४ हजार सातशे एकाहत्तर)
  • पुरुष - २२,६२,९३,२०१ (५१.५२%)
  • स्त्री - २१,२९,४१,५७० (४८.४८%)
  • लिंग गुणोत्तर - ९४१ महिला प्रति १००० पुरुष
  • १९६१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण साक्षरता २४.०२% ,तर पुरुष साक्षरता ३४.४४% आणि स्त्री साक्षरता १२.९५% एवढी होती.
  • लोकसंख्येची घनता - १४२ प्रति कि.मी.
  • शहरी लोकसंख्या १७.९७%

राज्य निहाय लोकसंख्या

संपादन

धर्म निहाय लोकसंख्येचे विवरण

संपादन
धार्मिक समूह लोकसंख्या % १९९१
हिंदू ८३.४५%
मुस्लिम १०.६९%
ख्रिश्चन २.४४%
शीख १.७९%
बौद्ध ०.७४%
जैन ०.४६%
पारसी ०.०९%
अन्य ०.४३%

हे सुद्धा पहा[संपादन]

संपादन