१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती. १९५१ मध्ये भारताची लोकसंख्या १८,५५,२८,४६२ पुरुष आणि १७,५५,५९,६२८ स्त्रिया अशी एकूण ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद) होती. १९५१ मध्ये एकूण लोकसंख्या ही स्वातंत्र्याअगोदरच्या जनगणनेपेक्षा १३.३१% ने अधिक वाढली होती. []

१९५१ भारताची जनगणना

← १९४११९५०-१९५१ १९६१

सामान्य माहिती
देश भारत
परिणाम
लोकसंख्या ३६,१०,८८,०९० (१३.३१% )
साक्षरता १६.६७%
लिंग गुणोत्तर ९४६
लोकसंख्येची घनता ११७

जनगणना

संपादन

१९५१ च्या जनगणनेनुसार,

  • भारताची एकूण लोकसंख्या - ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद)
  • पुरुष - १८,५५,२८,४६२ (५१.३८%)
  • स्त्री - १७,५५,५९,६२८ (४८.६२%)
  • लिंग गुणोत्तर - ९४६ महिला प्रति १००० पुरुष
  • १९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण साक्षरता १६.६७% ,तर पुरुष साक्षरता २४.९५% आणि स्त्री साक्षरता ७.९३% एवढी होती.
  • लोकसंख्येची घनता - ११७ प्रति कि.मी.
  • शहरी लोकसंख्या १७.२९%
  1. १९५१ मध्ये जम्मू-काश्मीरची जनगणना झाली नाही.

राज्य निहाय लोकसंख्या

संपादन

धर्म निहाय लोकसंख्येचे विवरण

संपादन
धार्मिक समूह लोकसंख्या % १९९१
हिंदू ८४.१%
मुस्लिम ९.८%
ख्रिश्चन २.३०%
शीख १.७९%
बौद्ध ०.७४%
जैन ०.४६%
पारसी ०.१३%
अन्य ०.४३%

हे सुद्धा पहा[संपादन]

संपादन
  1. ^ "census 1951" (PDF). 2018-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2021-12-26 रोजी पाहिले.