१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९७१ची भारताची जनगणना ही ११ वी जनगणना होती. १९७१ मध्ये भारताची लोकसंख्या २८,४०,४९,२७६ पुरुष आणि २६,४१,१०,३७६ स्त्रिया अशी एकूण ५४,८१,५९,६५२ (५४ करोड ८१ लाख ५९ हजार सहाशे बाव्वन्न) होती. एकूण लोकसंख्या ही १९६१ च्या जनगणनेत मोजलेल्या ४३,९२,३४,७७१ लोकांपेक्षा १०,८९,२४,८८१ ने अधिक वाढली, म्हणजेच २४.८० % जास्त.

१९७१ भारताची जनगणना

१९६११९७०-१९७१ १९८१

सामान्य माहिती
देश भारत
परिणाम
लोकसंख्या ५४,८१,५९,६५२ (२४.८०% )
पूर्वीची लोकसंख्या ४३९,२३४,७७१
सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेश उत्तर प्रदेश
सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश लक्षद्वीप
लिंग गुणोत्तर ९३०

जनगणना

संपादन

१९७१ च्या जनगणनेनुसार,

  • भारताची एकूण लोकसंख्या - ५४८,१५९,६५२ (५४ करोड ८१ लाख ५९ हजार सहाशे बाव्वन्न)
  • पुरुष - २८४,०४९,२७६ (५१.८२%)
  • स्त्री - २६४,११०,३७६ (४८.१८%)
  • लिंग गुणोत्तर - ९३० महिला प्रति १००० पुरुष
  • एकूण साक्षरता - २९.४६% , पुरुष साक्षरता ३९.४५% आणि स्त्री साक्षरता १८.७२%
  • लोकसंख्येची घनता - १७७ प्रति कि.मी. (भारताच्या घनतेचा अभ्यास करताना, त्या राज्यासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नसल्याने जम्मू आणि काश्मीरला वगळण्यात आले आहे.)
  • शहरी लोकसंख्या १९.९१  %

राज्य निहाय लोकसंख्या

संपादन

धर्म निहाय लोकसंख्येचे विवरण

संपादन
धार्मिक समूह लोकसंख्या % १९९१
हिंदू ८२.७३%
मुस्लिम ११.२१%
ख्रिश्चन २.६०%
शीख १.८९%
बौद्ध ०.७०%
जैन ०.४८%
पारसी ०.०९%
अन्य ०.४१%

साक्षरता[संपादन]

संपादन

१९७१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण साक्षरता २९.४६% ,तर पुरुष साक्षरता ३९.४५% आणि स्त्री साक्षरता १८.७२% एवढी होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

संपादन