दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे

(भाऊ हर्णेकर या पानावरून पुनर्निर्देशित)


दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे (५ जुलै, इ.स. १९१२ - ६ ऑगस्ट, इ.स. १९८३:मुंबई) हे मराठी लेखक होते.

दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे
Da.Pa.Khambete.png
जन्म ५ जुलै, इ.स. १९१२
महाराष्ट्र, भारत
मृत्यू ६ ऑगस्ट, इ.स. १९८३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

कारकीर्दसंपादन करा

युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भविष्य असे विविध लेखनप्रकार हाताळणारे लेखक म्हणून परिचित आहेत. विनोदी साहित्य लेखनातही त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांसाठी २० वर्षांहून अधिक काळ दरमहा लेखन केले. त्यांनी सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, अवधूत आंजर्लेकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी लेखन केले.

साहित्यसंपादन करा

  1. आटप,अरे आटप लवकर (रहस्यकथा)
  2. माझं नाव रमाकांत वालावलकर (विज्ञानकथा)
  3. दहा निळे पुरुष (विज्ञान काल्पनिका)
  4. चंद्रावरच खून (गूढकथा)
  5. न्यूनगंड (मानसशास्त्र)

मासिकांसाठी लेखनसंपादन करा

  1. लोकमान्य (मासिक)
  2. हंस (मासिक)
  3. मोहिनी (मासिक)
  4. नवल (मासिक)

निधनसंपादन करा

६ ऑगस्ट १९८३ रोजी दादर येथील विजयनगरमधील त्यांच्या घरी हृदयविकाराने निधन झाले.

बाह्य दुवेसंपादन करा